Wednesday, January 29, 2014

जस्सच्या तस्स राहील का सारं...?

जस्सच्या तस्स राहील का सारं...?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...?

धपाट्या बरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे?
रीझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न...काय हे?

सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेले पहिले-वहिले रोप.

ती दिड रुपया भाड्याची सायकल,
ब्रेकडांस व मूनवॉक करणारा तो मायकल.

पुन्हा खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग...?
आणि मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग...?

आवडती छ्त्री हरवेल का परत...?
मोडतील का बेत आल्यावर ठरत...?

शाळेतले मित्र-मैत्रीण परत मारतील का हाक...?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक...?

ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट...?
आउट झाले कारण चांगली नव्हती बॅट...?

होईल का टिव्ही - "ब्लॅक ऍन्ड व्हाईट"...?
पाहील्यावर एकदम चोरेल का तो नजर...?

"आयसक्रीम" ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं...?
मधल्या सुट्टीत खायला मिळतील का बोरं...?

जस्स च्या तस्स राहील का सारं....?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...



Maanus ani Zhaad... माणूस आणि झाड …

Maanus ani Zhaad...  माणूस आणि झाड …

Monday, January 27, 2014

धन्य ती माउली ....

पतीच्या उपचारासाठीसाठी बारामती मॅरेथॉनमध्ये धावली ६६ वर्षीय माऊली - घरी अठराविश्व दारिद्र्य गाठीला असणारा पैसा तिनीही मुलींच्या लग्न खर्च झाला. वृद्ध झालेल्या पतीचे आजारपण, मोलमजुरी करून चालवलेला संसाराचा गाडा. पती तर आजारातून उठला पाहिजे ही एकमेव आशा, परंतु तेवढे पैसेही गाठीला नाहीत आणि या जिद्दीच्या जोरावरच या माऊलीने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही.

तीन किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये या ६६ वर्षाच्या माऊलीने आपल्या नववारी साडीसह अनवाणी पायाने धावत ही स्पर्धा जिंकली. पतीचे एम.आर.आय स्कॅन करण्यासाठीच्या पैशासाठीच आपण धावलो आणि त्यात आपण जिंकलो हे समाधान या माऊलीच्या चेहर्यावर झळकत होते.

एरव्ही स्पोर्टशूज घालून धावणारे स्पर्धकांनाही लाजवणार्या या माऊलीचे नाव आहे लता भगवान करे मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या रहिवाशी असणार्या या माऊली या अगोदर कुठल्याही मॅरेथॉनचा अनुभव नसतानाही रोज सकाळी शेतात जाऊन काम काम करणे आणि घरात जे काही असेल ते खाणे हाच या यांचा डाएट आणि अनुभव. परंतु अंथरुणाला खीळलेल्या पतीला बरे करण्याच्या उद्देशाने अनवाणी पायाने कडक्याच्या थंडीत धावणार्या या माऊलीच्या जिद्दीने उपस्थितांचे डोळे पाणावले व माऊलीला सलाम केला. यावेळी यापुढेही होणार्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

Tuch Aahe Tujhya Jivanacha Shilpakar...

Tuch Aahe Tujhya Jivanacha Shilpakar...
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकर…

Sunday, January 26, 2014

आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा..

आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा..

२६ जानेवारी १९५०.. आपला पहिला प्रजासत्ताक दिन. या दिवशी ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट (१९३५) या ब्रिटिश कायद्याच्या साखळीतून आपण पूर्णपणे मोकळे झालो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेल्या समितीने घटना आपल्याला दिली

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!..

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!..



Prajasattak Din...प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा...!
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करू या...
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊ या...
सर्व भारतीयांना ६४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!..

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला.
हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.

 हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.


Friday, January 24, 2014

Anandi... आनंदी …

Anandi... आनंदी …

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी...सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा...हवा बेताची गार असावी...हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी...ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे...आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा...दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी...आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे...यथेच्छ भोजन व्हावे...मस्त पान जमावे...इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा...गार पाणी प्यावे...आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की, संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवर्यासारखा फिरायला देखील जातो; विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणी देखील घेऊन देतो!

-पु.ल.
(माझे खाद्यजीवन : हसवणूक)

Thursday, January 23, 2014

हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांस विनम्र अभिवादन…

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंती निमित्त
त्यांस विनम्र अभिवादन… !!

सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!! जय हिंद वंदे मातरम !!!

Prem... प्रेम ...

Prem... प्रेम ...

Wednesday, January 22, 2014

मास्टर ब्लास्टरचा असाही मास्टरस्ट्रोक

मास्टर ब्लास्टरचा असाही मास्टरस्ट्रोक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती आज पुन्हा आली. मास्टर ब्लास्टरनं आज परळच्या वाडिया हॉस्पिटलला भेट देऊन, तिथं अॅडमिट असलेल्या आजारी मुलांच्या आणि त्याच्या पालकांच्या चेहऱ्यांवर स्मितहास्याची लकेर उमटवण्याचा प्रयत्न केला.

हृदयविकारांनी त्रस्त असलेल्या लहान मुलांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक निधी जमा व्हावा, त्यांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करता याव्या, यासाठी सिद्धीविनायक ट्रस्ट आणि वाडिया हॉस्पिटलच्या पुढाकाऱानं लिटिल हार्ट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे.

सचिनने या इस्पितळाला 10 लाख रुपयाचे अनुदान ही दिले आहे.

दाटले रेशमी आहे धुके धुके...

मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां

दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके, दाटले हे धुके

दिवे लाखो मनामध्ये लागले लागले
दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके

मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां

रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली रे ना कळे
बेफिकीर मन हे झाले, भान प्रेमाचे आले आले
बावरे स्पर्श हे सारे नवे नवे

झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवून का तुला रे झाले मी बावरी
बेफिकीर मन हे झाले, भान प्रेमाचे आले आले
सोपे होईल सारे तुझ्यासवे ...

Thursday, January 16, 2014

Pahile Prem... पहिले प्रेम ...

Pahile Prem... पहिले प्रेम ...

पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे निधन झाले.

विद्रोहाचे वादळ थांबले
प्रख्यात कवी, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

नामदेव ढसाळ यांची कविता

माणसाने

माणसाने पहिल्या प्रथम स्वतःलापुर्ण अंशाने उध्वस्त करून घ्यावेचरस गांजा ओढावा
अफ़ीम लालपरी खावी
मुबलक कंट्री प्यावी
याला त्याला कुणालाही आयभयणीवरूनगाली द्यावी, धरून पिदवावे
मर्डर करावा, झोपलेल्यांची कत्तल करावी
पोरीबाळीम्शी सइंद्रिय चाळे करावे
म्हातारी म्हनू नये,तरनी म्हणू नये
कवळी म्हणू नये,सर्वांना पासले पाडावे
व्यासपिठावर समग्र बलात्कार घडवून आणावे
येशुच्या, पैगंबराच्या, बुद्धाच्या, विष्णुच्या वंशजांना फ़ाशी द्यावे
देवले मशिदी शिल्पे म्युझियम कुस्करून टाकावे
हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे.

नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
अभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
माणसावरच सुक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने.

Tuesday, January 14, 2014

हलव्याचे दागिने...

 मकरसंक्रांतीनिमित्त हलव्याचे पारंपारिक दागिने तयार करण्यात येतात.

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

संक्रातीच्या हार्दिक शूभेच्छा !!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
 जीवन असावे तिळगुळासारखे.
"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

Monday, January 13, 2014

माँ साहेब जिजाऊ यांची आज जयंती

हिंदवी स्वराज्य पोटाशी लावून धरणार्य माँ साहेब जिजाऊ यांची आज जयंती . .
कोटि कोटि नमन ।।

आजच्या या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली.
हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता-रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्यामध्ये शिवबा घडवला.


स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने
शिवाबंसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला...


Wednesday, January 08, 2014