लिंबू मिरची
ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल .
पण हे का?
असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.
ह्याचे उत्तर असे आहे कि मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.
त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे.
जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात
. बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात , आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई. अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी लावला जात.
पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे.
ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश….!