Showing posts with label Viraha. Show all posts
Showing posts with label Viraha. Show all posts

Wednesday, June 22, 2016

सांजेच्या काठावरती

सांजेच्या काठावरती
अलवार क्षणांच्या भेटी
ही प्रीत आपली आहे
की शतजन्मांच्या गाठी...
कोणती तपस्या केली
ज्याने तू माझी झाली
आयुष्य घेतले माझे
थरथरत्या पदराखाली...
एकांत भावतो मजला
जो तुझी आठवण देतो
हा तुझ्या दिशेचा वारा
येतो अंगास बिलगतो...
एवढा दुरावा असुनी
भेटतो मनाने आपण
मग कायेवरती चढते
नाजुक स्पर्शांचे लेपण..
बोटाने नाव गिरवतो
वाळुत मुलायम ओल्या 
तू दिसते नावामध्ये
मन कातर झाल्या झाल्या...
ओंजळीस आयुष्याच्या
तू ओंजळ लाव तुझीही
पेटता दिवा प्रेमाचा
नाही विझणार कधीही...
-- संतोष

Wednesday, June 08, 2016

प्रेम कधीच अधुरे राहत नाही

प्रेम कधीच अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी,
राजा पासून दुरावलेली
एक राणी...

Tuesday, June 07, 2016

तुझ्यासाठी....

तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही
तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही
अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी

तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो
प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो
हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी

आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला
खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला
आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी

तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी

हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही
तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही
तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी

एक एकटा एकटाच

Wednesday, May 20, 2015

एकांत माझा

एकांत माझा

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.

हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा.

तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.

अखेर भेटला नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.

दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

– सुरेश भट

Monday, May 18, 2015

दुखः प्रेमातल्या विरहाचं

दुखः प्रेमातल्या विरहाचं
आज तिलाही कळाल होतं
म्हणूच मिठीत मला तिने
आज स्वतः मध्ये लपवला होतं
~ सुधीर जगताप

Wednesday, April 01, 2015

तू दिलेल्या दुः खाने

तू दिलेल्या दुः खाने
मला बरेचं काही शिकवले
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले…

आठवण आली तुझी की...

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....

-विशाल...ग़ारवा


Tuesday, March 17, 2015

त्या क्षणी ...

चुक मी केली त्या क्षणी ..
तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी..

प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..
पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त

मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..
तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती ...

रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या ...
मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या ....

बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..
तिच्या डोळ्यात पानी पाहून मन आनंदून जायचे..

झुगारून प्रेम तिचे, वैरी जालो मी तिच्या प्रेमाचा....
"नेहमी खुश रहा"..म्हणुन निरोप दिला तिने प्रेमाचा...

आज तिच्या आसवांची किंमत माला कलते आहे....
माझ्या आसवानी त्याची परतफेड मी करतो आहे.....

चुकलो, चुकलो मी म्हणुन मन माझे रडते आहे...
रोज तिला शोधण्यासाठी आकाश पाताल एक करतो आहे....

खूप अवघड असत...

खूप अवघड असत
त्या एका चेहऱ्याला विसरणं
त्याच्याजवळ असून सुद्धा
त्याच्यासाठी तरसण…
- सुधीर जगताप

Monday, March 09, 2015

मी गुलाब आणले होते

मी गुलाब आणले होते
काटे काटे ते काढून
नव्हते माहीत तेव्हा
काय ठेवलाय वाढून...!!

मी गुलाब आणले होते
तुला तुलाच द्यायला
तुझ्या नजरेचे बोल
सारे टिपून घ्यायला...!!

मी गुलाब आणले होते
लाल लाल मखमली
आत खोल काळजात
होती दसरा दिवाळी

मी गुलाब आणले होते
तू दिसता दिसना
इथे तिथेही पाहिले
कुठे कुठेच भेटेना...!!

दिस ढळत निघाला
चालले गुलाब कोमेजून
माझे मीच ते तेव्हा
गेलो होतो समजून

बसलो दूर पारावर
लागेना कशाचाच थांग
कापर शिरशिरी भरे
सुन्न झालं होत अंग

तुला दिलेच नाहीत
देऊ आता त्या नदीला
गेला हात बाजूला ते
गुलाब घ्यायला

नव्हते तिथे ते गुलाब
पण मखमल होती
नाजूक मनगटी तुझ्या
मोतीमाळ पण होती

पाहिले मी न तुला
न गुलाब ते दिले
पण दिसले ते मला
नेत्र दोन पाणावलेले ...!!
मी गुलाब आणले होते....!
Rohit Gadre.


Tuesday, January 13, 2015

निशब्द एका तळ्या काठी....

निशब्द एका तळ्या काठी,
मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो.
पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये,
ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब, अन तिथे मी एकटाच होतो.
© कौस्तुभ


Tuesday, October 14, 2014

रुसवा

रुसवा
रुसण्यात काय हर्ष आहे हसण्यात ही फसून जा
गुलाम आहे तुझाच मी राणी पुन्हा बनून जा

आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा

लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा
विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला

एकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा
जेडी

Sunday, May 04, 2014

Tu ani Tujhya Aathvani...

तू माझ्या आयुष्यात नसण,
हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,,
म्हणूनच लवकर ये ..
माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये, जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मी तुझी वाट पाहतेय,,
क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून ..
रक्तबंबाळ होतानाही .. माझे श्वास तुझेच असतात
अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय ,
त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण ..
या वेड्या मनाला ..
तुझी अन फक्त तुझीच ..
ओढ आहे..—