Showing posts with label Navratri. Show all posts
Showing posts with label Navratri. Show all posts

Wednesday, October 14, 2015

नवरात्र.... रंग

नवरात्र....

एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

नववा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.

जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!

Tuesday, October 13, 2015

नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 || सर्व मंगल मांगल्ये ,शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

नवरात्र महोत्सव मधील येणाऱ्या ९ दिवसात तुमचे सर्व मनोरथ,संकल्प पूर्ण व्हावेत तसेच नेहमी आरोग्य उत्तम राहून आपणास ऊदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करतो.

Friday, October 03, 2014

दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!
आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

Thursday, October 02, 2014

दसरा रम्य उत्सव प्रेमाचा !

रम्य सकाळी, किरणे सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजीरी,
उमलगे आनंद मनी,
जल्लोष हा विजयाचा हसरा
रम्य उत्सव प्रेमाचा
तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!

Friday, September 26, 2014

महाराष्टातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन....

महाराष्टातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन.......
1-रेणुका माता ,माहुरगड.
2- तुळजाभवानी ,तुळजापुर .
3-महालक्ष्मी ,कोल्हापुर.
4-सप्तशृंगी ,वणीगड (नाशिक).
"जय माता दी "

Friday, October 11, 2013

कालरात्री माता की जय !!!


आज सप्तमी कालरात्री माता व सरस्वती माता पूजा दिवस
बोला कालरात्री माता की जय !!!
बोला सरस्वती माता की जय !!!

Thursday, October 10, 2013

कात्यायणी माता की जय !!!!

आज पष्टी कात्यायणी माता पूजा दिवस
बोला कात्यायणी माता की जय !!!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Wednesday, October 09, 2013

स्कंदमाता पूजा दिवस

आज ललित पंचमी स्कंदमाता पूजा दिवस
बोला स्कंदमाता की जय !!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Tuesday, October 08, 2013

बोला कुष्मंदा माता की जय !!!

आज चतुर्थी कुष्मंदा माता पूजा दिवस…
बोला कुष्मंदा माता की जय !!!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Saturday, October 05, 2013

Navratri.... नवरात्री...

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके..!
शरण्ये ञ्येंबके गौरी नारायणि नमोस्तुते..!!
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....!!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि
तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन
आनंदमय आणि सुखमय होवो,
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.!!!

Friday, October 04, 2013

Tuesday, October 16, 2012

Pahuni ... पाहुणी ...

Pahuni ... पाहुणी ...

Aaj Navratra Ghatasthapana...
आज नवरात्रारंभ-घटस्थापना!