Showing posts with label Sundar Mulgi. Show all posts
Showing posts with label Sundar Mulgi. Show all posts

Thursday, July 02, 2015

तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...


दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.

Wednesday, May 20, 2015

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

– आरती प्रभू

Wednesday, March 11, 2015

ती...

ती

त्या दिवशी कॉलेज मध्ये
वेगळच काहीतरी घडलं
तिच्याशी झालेल्या eye-contact ने
गणितच माझं बिघाडलं

तिचा आवाज ऐकल्यावर
हृदयाचा ठोका वाढू लागला
ती समोर येताच
चेहरा माझा खुलू लागला

तिची स्तुति करायला
शब्दही मला कमी पडतात
ती दूर जाताना
मनाला माझ्या भोकं पडतात

दिवसाचे तास कसे संपायचे
तेच मला कळत नव्हतं
कॉलेजची वेळ संपल्यावर
मन बाहेर रमत नव्हतं

तिला बघण्यासाठी
सगळी लेक्चर्स attend केली
पण मी येतो म्हणुनच की काय
तिने सगळीच bunk केली

शनिवार,रविवार सुट्टी म्हणुन
photos तिचे बघायचे
आठवड्याचे सातही दिवस
तिचेच विचार करायचे

तिचं ते स्मितहास्य
मनात घर करून राहतं
आयुष्यातल वळण
तेजोमय करून जातं

college च्या शेवटच्या दिवशी
मन माझं बिथरुन जाईल
ती समोर येताच
'अलविदा' तेवढ म्हणुन जाईल...


Friday, January 23, 2015

तिने किती सुंदर दिसावं..

तिने किती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं...

तिने किती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं
सोबत तिच्या...

तिने किती साधं रहावं
त्यातही रूप तिचं खुलावं
कोणीही फिदा व्हाव
अदांवर तिच्या...

तिचं उदास होणं
कसं हृदयाला भिडावं
कोणालाही वाईट वाटावं
अश्रूंनी तिच्या...

तिचं हसणं
कोणालाही सुखवावं
कोणीही घसरून पडावं
गालावरल्या खळीत तिच्या...

तिच्या नजरेने मलाच शोधावं
अचानक नजरेने नजरेला भिडावं
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं
लाजेने चूर चूर व्हावं...

ती समोर असताना
मी सारं काही विसरावं
तिने इश्य करत लाजावं
मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं...

तिने फक्त माझंच रहावं
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं
साथ देऊ जन्मोजन्मी
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

Sunday, April 13, 2014

तुझ्या गालावरची खळी

तुझ्या गालावरची खळी..

चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी,
आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी,
प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे,
पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे,
मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायची
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं..
माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं,
किती नाही म्हंटल  तरी आपसूक नजर वळायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

माझ्या स्वप्नातली तू आजही तशीच आहेस...
शेवटच चॉकलेट मनात आजही जपल आहे,
माहित आहे मला आता नाही वाट पाहायची,
कारण ती खळी आता पुन्हा नाही दिसायची,
जी मला रोज रोज तुझ्या प्रेमात पाडायची....
तुझ्या गालावरची खळी.... 

मोनीष शेखर चौबळ

Thursday, December 19, 2013

Tujhe Soundarya... तुझे सौंदर्य ...

तुझ्या निखळ सौंदर्याकडे
बघून सुंदरताही लाजलीयं.
तुझे हास्य ऐकून,
खुद्द हास्यही हिरमुसलयं.

त्या खळखळणा-या निरझराने,
तुझीचं प्रेरणा घेतलीयं.
वेणूंच्या सप्तसुरांनीही,
तुलाचं साद घातलीयं.

तुला बघितल्यापासून,
माझे शब्दचं हरवलेत.
पण माझ्या ह्रदयाचे गीत,
माझे ओठ गुणगुणतं आहेत.

तुझ्या प्रेमाने माझ्यावर,
एक वेगळीचं जादू केलीयं.
देवाकडे काय मागू तूला,
तो स्वतःचं माझ्याकडे तुला मागायला आलायं.

Wednesday, November 28, 2012