Showing posts with label Holi. Show all posts
Showing posts with label Holi. Show all posts

Thursday, March 05, 2015

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या आयुष्यातील दुःख-पीड़ा यांचे
होळीमध्ये दहन होवून तुमच्या जीवनात
सप्तरंगाची उधळण होवू दे याच शुभेच्छा.
माझ्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणीना तसेच
त्यांच्या कुटुंबियाना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Sunday, March 16, 2014

खल भावानंची आम्ही करणार होळी

खल भावानंची आम्ही करणार होळी,
अशी आगळीच आता जा ळणार होळी
दाही दिशांत चेतवू वणवा असा की,
या विश्वात ना ती सामावणार होळी
अबलांचे व्हावे असे सबलीकरण,
मग कोण करण्या थजावणार होळी
आमच्या जीवांशी ज्यांनी केळला
शिमगा
आज आम्ही त्यांची पेटविणार होळी
ज्ञानगंगेच्या रंगात न्हाऊ जर का सारे
अंधविचारांची कशी नाही होणार होळी
द्वेषाग्नीला हवी फुंकर प्रेमाची
द्वेषाने का? द्वेषाची विझणार होळी
घरोघरी जेव्हा विखुरतील सप्तरंग
तेव्हाच खरी देशांत रंगणार होळी.
अनिल कोशे

Tuesday, March 26, 2013

होळी रे होळी !!! पुरणाची पोळी !!

होळी रे होळी !!!
पुरणाची पोळी !!
पुरण पोळी हि महाराष्ट्राची परंपरा आहे
मराठी संस्कृतीची परंपरा आहे !!

Holi re Holi ... होळी रे होळी

Holi re Holi   ... होळी रे होळी

Holi re Holi ... होळी रे होळी


Holi re Holi   ... होळी रे होळी

Sunday, March 20, 2011

Holi....होळी....

Holi....होळी....

“होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!!

Rang Udhala Re...रंग उधळा रे...

Rang Udhala Re...रंग उधळा  रे...
“होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!!

Tuesday, March 10, 2009

Thursday, March 20, 2008

होळी आली रे !!!!!!!!

होळी आली रे !!!!!!!!

तुम्हीच रंग तयार करा घरच्या घरी!

होळी ली रे !!!!!!!!

तुम्हीच रंग तयार करा घरच्या घरी!

फुले, फळे आणि पानांपासूनही घरच्याघरी रंग बनवता येतात व ते शरीराला घातकही नसतात. ….
हिरवा - मेंदी पावडर कोणत्याही पिठात मिसळा. सुंदर हिरवा रंग तयार होईल. अथवा पालक, गुलमोहर, पुदिना किंवा कोथिंबीर यांची पाने वाळवा (कागदात गुंडाळून ती फ्रीजमध्ये ठेवावीत) व त्याची पूड तयार करा.

पिवळा - दोन चमचे हळद पावडर आणि चार चमचे बेसन पीठ एकत्र करून पिवळा रंग तयार होऊ शकतो। अथवा बहावा, झेंडू, पिवळी शेवंती, काळी बाभूळ यातील कोणत्याही फुलाच्या पाकळ्या सावलीत वाळवून पूड करून त्यात बेसनाचे पीठ मिसळा. ओल्या रंगासाठी बहावा किंवा झेंडू फुले पाण्यात घालून उकळा.

लाल - लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळवून पूड करा आणि त्यात कोणतेही पीठ मिसळा. ओल्या रंगासाठी लाल डाळिंबाची साल पाण्यात उकळा. किंवा रक्तचंदनाची पावडर एक लिटर पाण्यात घालून उकळा.
किरमिजी - बीट किसून एक लिटर पाण्यात मिसळा। हे मिश्रण उकळा अथवा रात्रभर तसेच ठेवा. अथवा दहा ते पंधरा गुलाबी रंगाच्या कांद्याची साले अर्ध्या लिटर पाण्यात उकळा.

केशरी - पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून किंवा उकळून सुगंधी केशरी रंग मिळतो। फुले वाळवून पूड केल्यास कोरडा रंग होतो.

काळा - वाळलेली आवळ्याची फळे लोखंडाच्या भांड्यात उकळा आणि रात्रभर तशीच ठेवा. पाणी घालून रंग फिका करा आणि वापरा.अशा रंगाच्या सहाय्याने होळी साजरी करा।

http://majhablog.in/