होळी आली रे !!!!!!!!
तुम्हीच रंग तयार करा घरच्या घरी!
फुले, फळे आणि पानांपासूनही घरच्याघरी रंग बनवता येतात व ते शरीराला घातकही नसतात. ….
हिरवा - मेंदी पावडर कोणत्याही पिठात मिसळा. सुंदर हिरवा रंग तयार होईल. अथवा पालक, गुलमोहर, पुदिना किंवा कोथिंबीर यांची पाने वाळवा (कागदात गुंडाळून ती फ्रीजमध्ये ठेवावीत) व त्याची पूड तयार करा.
पिवळा - दोन चमचे हळद पावडर आणि चार चमचे बेसन पीठ एकत्र करून पिवळा रंग तयार होऊ शकतो। अथवा बहावा, झेंडू, पिवळी शेवंती, काळी बाभूळ यातील कोणत्याही फुलाच्या पाकळ्या सावलीत वाळवून पूड करून त्यात बेसनाचे पीठ मिसळा. ओल्या रंगासाठी बहावा किंवा झेंडू फुले पाण्यात घालून उकळा.
लाल - लाल जास्वंदाची फुले सावलीत वाळवून पूड करा आणि त्यात कोणतेही पीठ मिसळा. ओल्या रंगासाठी लाल डाळिंबाची साल पाण्यात उकळा. किंवा रक्तचंदनाची पावडर एक लिटर पाण्यात घालून उकळा.
किरमिजी - बीट किसून एक लिटर पाण्यात मिसळा। हे मिश्रण उकळा अथवा रात्रभर तसेच ठेवा. अथवा दहा ते पंधरा गुलाबी रंगाच्या कांद्याची साले अर्ध्या लिटर पाण्यात उकळा.
केशरी - पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून किंवा उकळून सुगंधी केशरी रंग मिळतो। फुले वाळवून पूड केल्यास कोरडा रंग होतो.
काळा - वाळलेली आवळ्याची फळे लोखंडाच्या भांड्यात उकळा आणि रात्रभर तशीच ठेवा. पाणी घालून रंग फिका करा आणि वापरा.अशा रंगाच्या सहाय्याने होळी साजरी करा।
http://majhablog.in/
No comments:
Post a Comment