Friday, March 14, 2008

विनोदाचा "दादा"- पुण्यस्मरण....Dada Kondke


विनोदाचा "दादा...'

भारतीय चित्रपटसृष्टीला दोन दादांचे अफाट योगदान आहे. एका दादांनी अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म दिला. दादासाहेब फाळके त्यांचं नाव. दुसऱ्या दादांनी "थेटर'चा पडदा फाटेल, इतकं खळखळून हास्य चित्रपटसृष्टीला दिलं. दादा कोंडके त्यांचं नाव. चौदा मार्चला दादा कोंडके यांची दहावी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा. .......

काळाच्या पुढचा दिग्दर्शक
(विजय कोंडके)
"सोंगाड्या' पूर्ण होऊन त्याला वितरक मिळत नसतानाचा हा किस्सा आहे. या चित्रपटाच्या जवळपास ३०-३५ "ट्रायल्स' झाल्या; पण चित्रपट विकत घ्यायला कोणी पुढे येत नव्हतं. या चित्रपटातील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीवर अनेकांचा आक्षेप होता. ते या चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांना पाहत होते. .......


दादांचे चित्रपट "क्‍लासिक'!

(मकरंद अनासपुरे)
ज्या माणसानं आयुष्यात खूप जास्त दुःख भोगलंय, त्याला उत्तम विनोद करता येतो, असं म्हणतात. दादा कोंडकेंनी खूप भोगलं म्हणूनच त्यांचे सर्व चित्रपट एकापेक्षा एक असे सरस मनोरंजन करणारे ठरले. सामान्य माणसाला समजेल, उमजेल असा विनोद त्यांनी आपल्या चित्रपटाद्वारे सादर केला. .....

दादा नावाचं वादळ...!
विनोदाने नेहमीच त्यांच्या पायाशी लोळण घेतली असा अवलिया. या "ज्युबिली किंग'च्या निधनाला पाहता पाहता १० वर्षे लोटली. आपल्या "विच्छा'शक्तीच्या जोरावर मराठी मनावत आगळे स्थान मिळविणाऱ्या दादांचे हास्यस्मरण २० मार्च रोजी करण्याचे "साम मराठी' वाहिनी, "सकाळ' आणि कै. दादा कोंडके प्रतिष्ठान यांनी करावयाचे ठरविले आहे. .......

विजय कोंडके दादांविषयी सांगतात...
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा

मकरंद अनासपुरे दादांविषयी सांगतात...
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा

दादांचे जीवनपट
स्लाईड शो पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

No comments:

Post a Comment