Thursday, March 20, 2008

Vacha Ani Anand Ghya.....वाचा आणी आनंद घ्या

वाचा आणी आनंद घ्या


हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?...
... अहो , आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
===================================================
* पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!
===================================================
* माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा... तो स्वत : हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!
===================================================
का ? का? का?
१ . पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल , तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
२ . स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक ' बसतात ' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
३ . जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का ?
४ . बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का ? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का?
===================================================
मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला .
त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत.
त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद
" जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ;
तेव्हा मला फ़ार गंमत वाटते .
त्याला हृदय नसतं ;
आणि
तिला डोके नसतं ...."

No comments:

Post a Comment