Showing posts with label Shree Ganesh. Show all posts
Showing posts with label Shree Ganesh. Show all posts

Friday, September 05, 2014

बाप्पांची इच्छा...

बाप्पांची इच्छा...
कपडे तुम्ही शिवाल तर अंग तुमचं झाकेल,
अन्न तुम्ही शिजवाल तर पोट तुमचं भरेल...
मी आहे चोहीकडे, मला एकाच ठिकाणी शोधू नका,
माझ्या नावाने अंधश्रद्धेचा स्त्रोत तुमही बनू नका
तूमच्या मनात माझा वास आहे, मुर्त्यांमध्ये मला पाहू नका,
आराधना माझी करण्यापेक्षा, स्वतःच्या आंतरातम्यात मला वाकून बघा..
रूप माझं एकच आहे, मी कुणाचा राजा नाही,
तुमचं दुःख जाणतो, एकटं तुम्हाला सोडणार नाही...
१०८ नावं आहेत माझी, अजून नावं देऊ नका,
गल्लो गल्ली प्रदर्शन उभारून अपमान माझा करू नका...
लाखो कोटींचे दान येते माझ्यापुढे, मी काय करू त्याचे,
माझी कृपादृष्टी आहेच तुमच्याववर, हे पैसे आहेत तुमच्या कष्टाचे....
घरा घरात माझी पूजा करता,
मग रांग लावून मंदीराकडे का धाव घेता..
खेळ मांडू नका माझ्यावरच्या श्रद्धेचा..
पावेन मी त्यालाच जो मार्ग निवडेल सत्याचा....

Tuesday, September 10, 2013

जय श्री गणेश

श्री गणेशाचे
छत्रपति संभाजी राजांनी बुधभूषण
या ग्रंथात केलेले केलेले वर्णन
-
" देवदानवकृतस्तुतिभागं
हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं
नमामि भवबालकरत्नम् || "

अर्थ –

" देवदानवांच्या स्तुतीने
संतुष्ट झालेल्या, दृष्टांचे
गर्वहरण करणाऱ्या,
भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणाऱ्या, ‘शिवाच्या’
पुत्रा गणेशा, तुला माझे
(संभाजीराजे) नमन असो. "
जय श्री गणेश
जय संभाजीराजे

गणेश चतुथीं च्या मन:पूर्वक शुभेच्छा

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा गौरी गणपतीचा सण आला ।
विनंती आमची बाप्पाला ||
सौख्यःसम्रुध्दीः संपत्तीः लाभो तुम्हांला ||
गणेश चतुथीं च्या मन:पूर्वक शुभेच्छा

Monday, September 17, 2012

Sangnare Bappa... सांगनारे बाप्पा...

Sangnare Bappa... सांगनारे बाप्पा... 
सर्वाना गणपतीच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणपती घरी येणार म्हणून मुले एकदम खुश असतात. अशाच एका लहान मुलाच्या मनात पडलेल्या प्रश्नांना कवितेचे रूप देण्याचा प्रयत्न.
 

Saturday, September 13, 2008