Showing posts with label Pu. La. Deshpande. Show all posts
Showing posts with label Pu. La. Deshpande. Show all posts

Wednesday, October 26, 2016

पु. ल. देशपांडे



"माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी". - पु. ल. देशपांडे
.
.
"कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही.


लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग !" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा !

समोरची बाई म्हणत असते,

"कसला हा भरजरी पोत !"

हा शांत.

गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.

समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: ।" ह्या चालीवर सांगत असतो.

सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,
"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"

एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.

आपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे"

खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.

--------- पु. ल. देशपांड

Friday, January 24, 2014

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

माझी सुखाची कल्पना एकच आहे...

आदल्या रात्री चार-साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफल रंगलेली असावी...सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा...हवा बेताची गार असावी...हातातली एखादी, लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी...ती वाचून शेवटले पान उलटता उलटता बारा-साडेबारा व्हावे...आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा...दोन मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पाने मांडली जावी...आणि क्षणार्धात आंबेमोहोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे...यथेच्छ भोजन व्हावे...मस्त पान जमावे...इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा...गार पाणी प्यावे...आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये!

कधी कधी देवाजी करूणा करतो, आणि असे घडतेही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की, संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवर्यासारखा फिरायला देखील जातो; विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणी देखील घेऊन देतो!

-पु.ल.
(माझे खाद्यजीवन : हसवणूक)

Wednesday, October 23, 2013

Pula Deshpande.... पु.ल.देशपांडे ...



**आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस.
**
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो"

** गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत.

**
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '

मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत
असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणत.

**
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही.

पु. ल. देशपांडे व मी आकाशवाणीवर एकत्र काम करत होतो. तेव्हा करारपद्धत असल्याने पगारात करार संपेपर्यंत वाढ होत नसे. एकदा आकाशवाणीच्या 27 केंद्रांचे प्रमुख संचालक आले होते. पुलंकडे पाहून ते म्हणाले, "देशपांडे, तुमचे पोट खूप वाढले आहे.' त्यावर पुलंनी तत्परतेने उत्तर दिले, ""धिस इज द ओन्ली इन्क्रीमेंट आय ऍम गेटिंग......''
**

Saturday, April 28, 2007

पु ल देशपांडे यान्चे कथा संगरह आणी माझी काही आवड्ती गाणी

राम राम मंडली ! ! ! ! ! !

पू देशपांडे यान्चे कथा संग्रह आनी माझी काही आवाद्ती गानी तुमच्या बरोबर share करत आहे .....
पहीले पू. . देशपांडे यान्चे कथाकथान संग्रह !!!
तर माग भरपूर माजा घ्या ! ! ! ! ! !


Powered by eSnips.com