Showing posts with label Vat Savitri. Show all posts
Showing posts with label Vat Savitri. Show all posts

Thursday, June 12, 2014

वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीच विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......

देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .

हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .

भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .

माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .

नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .

गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .

मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .

पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .

आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.

वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .

घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.

नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .

इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .

माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....

तुझ्याकडे काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?

Monday, June 04, 2012

वटपौर्णिमा - Vat Pornima

वटपौर्णिमा - Vat Pornima

विचार आधुनिक जरी ,
श्रध्दा देवावर माझी
होईन सौ जेव्हा मी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..

असेल ऑफिस जरी,
वडपूजा जमणार नाही
डगाळ आणून घरी,
करेल वटपौर्णिमा साजरी..

एवढा आटापिटा ,
फक्त तुझ्या साथीसाठी
होऊन थोडी स्वार्थी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..

विज्ञान म्हणते,
राखेत संपेल सर्वकाही
भोळे मन म्हणते,
तरीही...

एकच ' हा ' जन्म जरी ,
सावित्रीची लेक मी
अनंताच्या वाटेवरही
करेल तुला साथ मी.