Showing posts with label Team India. Show all posts
Showing posts with label Team India. Show all posts

Friday, March 07, 2008

Team India....टिम इंडिया.



त्रिवार वंदन तुला महेंद्रा,
त्रिवार वंदन तुला.
तुझ्या संयमी नेतृत्वाला,
तुझ्या टिमच्या कतृत्वाला
त्रिवार वंदन विजयश्रीला. १
एकोपा-विश्वास गमक हे,
तुझ्या उत्तुंग यशाचे,
कांगारूंना खडे चारशी
नमवूनी त्यांच्या देशी. २
तिरंग्याची तू शान राखिशी
ऐतिहासिक हि नोंद जयाची,
जिंकूनी तू तर जिंकिलेस रे,
भारतीयांच्या मना.
आंम्हा भारतीयांच्या मना. ३


अलकाताई.