Showing posts with label Prem. Show all posts
Showing posts with label Prem. Show all posts

Friday, June 10, 2016

तुला म्हणून सांगते ....

तुला म्हणून सांगते .....

पुन्हा पुन्हा शहारते, तुला म्हणून सांगते,
मिठीत वेड वाढते, तुला म्हणून सांगते .....

जिथे जिथे खुणा तुझ्या, वसंत पेरतो सख्या,
तिथेच मी विसावते, तुला म्हणून सांगते......

तुझी प्रिया तुझ्यासवे, नभात झेप घ्यावया,
गगनझुलाच मागते, तुला म्हणून सांगते ....

नजर कधी न लागण्या, तुला कुण्या सुरंगिची,
इथून दृष्ट काढते, तुला म्हणून सांगते.....

तुझे अबोल राहणे, दिशात शून्य पाहणे,
क्षणात मौन वाचते, तुला म्हणून सांगते....

धुक्यास पांघरून मी, तनामनास जाळते,
दवात रात जागते, तुला म्हणून सांगते......

तुझ्याच आरशातला, चुकार चेहरा पुन्हा,
नव्या ऋतूत पाहते, तुला म्हणून सांगते ......

माधुरी

Wednesday, June 08, 2016

प्रेम कधीच अधुरे राहत नाही

प्रेम कधीच अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी,
राजा पासून दुरावलेली
एक राणी...

Monday, October 05, 2015

वेड्या मनाला सखे आता कसा आवरू

पापण्यांचे पंख लावून
आज उडू पाहतय पाखरू...
तूच सांग या वेड्या मनाला
सखे आता कसा आवरू....

Thursday, July 02, 2015

तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...


दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.

Tuesday, June 30, 2015

तुझी आठवण येताना


"तुझी आठवण येताना

गंध तुझा घेउन येते,

हरवलेल्या स्वप्नांना

रंग तुझा देउन जाते..

तुझ्या पैजणांची रुणझुण

कानांमध्ये दाटुन येते,

मी मिटुन घेतो डोळे तेव्हा

तु मिठीत हळुवार भेटुन जाते...

स्वप्नांतले जगणे माझे

वास्तवाचे भान सुटुन जाते,

मनात तुझ्या आठवांचे

पुन्हा रान पेटुन येते....

तुझी आठवण येताना

गंध तुझा घेउन येते..,

हरवलेल्या स्वप्नांना

रंग तुझा... देउन जाते....."

Thursday, June 18, 2015

तुझ्या माझ्यातलं नातं

तुझ्या माझ्यातलं नातं
जसा आभाळाचा श्वास 
कधी रणरणतं ऊन 
तर कधी हलक्या सरींचा भास  …  

Thursday, June 11, 2015

....नाही तर तुमचे आय़ुष्य शुन्य होईल

लग्नाची ही पहिली दोन-तिन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात
हातात हात घालून गप्पा मारायचे असतात,नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.
पण हे ही दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात, कारण थोड़ी हौस-मौज केली जाते, थोड हिंडन-फिरण होत, खरेदी होते
मग हळूच चाहुल लागते बाळाची
आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो
सर्व लक्ष आता बाळावर केन्द्रित होते
त्याच खाण-पिण, उठ-बस, शी-शु
त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक...वेळ कसा फटाफट निघून जातो
एव्हाना तिचा हाथ नकळत त्याच्या हातून सूटलेला सतो, गप्पा मारन, हिंडन-फिरण केंव्हाच बंद झालेले असत, पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही.
अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.
बाळ मोठ होत जात..ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात.
घराचा हप्ता,गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन.
तो पूर्ण पणे स्व:तला कामात झोकुन देतो.
बाळाचे शाळेत admission होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.
एव्हाना पस्तिशी आलेली आसते,
स्व:तच घर असत, गाडी असते.
बैंकेत बर्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी ही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते, त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते
आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला ' एकच प्याला ' सुरु करतो
दिवासामागुन दिवस जात असतात ; मूल मोठ होत असत, त्याच स्व:तच एक विश्व तयार होत असत..
त्याचीही दहावी येते आणि जाते
तो पर्यन्त दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.
एका निवांत क्षणी,त्याला मग ते जुने दिवस आठवतात
वेळ साधुन "तो" तिला म्हणतो, अग, ये ज़रा अशी समोर, बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठ तरी फिरायला जावू...
ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते ' कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला ; ढीगभर काम पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत '
कमरेला पदर खोचुन ती निघून जाते..
मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात, केस आपला काळा सोडू लागलेले असतात...मूल आता college मध्ये असत.. बैंकेत शून्य वाढत असतात...तिन आपल नाव भजनी मंडळात मध्ये घातलेल असत... आणि ह्याचे वीकेंड चे ' एकच प्याला ' चे कार्यक्रम सुरुच असतात...
मूल college मधून बाहेर पडत...आपल्या पायावर उभ राहत, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जात..
आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते...तिलाही चश्मा लागलेला असतो. आता "तो" तिला म्हातारी म्हणु लागतो, कारण हाच म्हातारा झालेला असतो..
पंच्च्चावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते... बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसत..एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात...
औषध-गोळ्या यांच्या वेळ वार ठरलेले असतात...डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात...मूल मोठ झाल्यावर लागतील म्हणून घेतलेल चार-पाच खोल्यांच घर अंगावर येत असत..
आता मूल कधीतरी परत येतील ही वाट बघन तेवढच काय ते हातात असत...
आणि तो एक दिवस येतो..संध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...तो लगबगीने जावून फोन घेतो, समोरुन मुलगा बोलत असतो..मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोड़ा गड़बड़तो, काय बोलावे हे त्याला सुचतच नाही, म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्या विषयी काय करायच ते विचारतो... आता परदेशातल्या शुन्याच्या मानाने म्हातार्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते...तो म्हातार्याला एक सल्ला देतो ' एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला दया आणि तुम्हीही तिथेच रहा ' पुढच थोडस जुजबी बोलून मुलगा फ़ोन ठेवून देतो.
म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो, म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते
" तो " तिला हाक मारतो ' अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू '
म्हातारी चक्क म्हणते ' हो आलेच '
म्हातार्याला विश्वासच वाटत नाही, आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो
तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो, डोळ्यातल तेज कमी कमी होत जात...आणि ते निस्तेज होतात...
म्हातारी आपल आटपुन म्हातार्या शेजारी झोपाळयावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचय.. पण म्हातारा काहीच बोलत नाही..ती म्हातार्याला हात लावते..शरीर थंड गार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातीराला बघत असतात
क्षणभर म्हातारी हादरते; सुन्न होते, तिला काय कराव हेच सुचत नाही, पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते...
हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.
म्हातार्याचा थंडगार हात घेते आणि म्हणते ' चला कुठे जायचय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...'
अस म्हणत, म्हातारीचे डोळे पाणवतात, एकटक नजरेन ती म्हातार्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रु गोठून जातात.
आणि म्हातारीची मान अलगद म्हातार्याच्या खांद्यावर पड़ते.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो....
त्यासाठी नुसते शुन्यच जमा करत बसु नका मुलासाठी. नाही तर तुमचे आय़ुष्य शुन्य होईल.
हे ज्याने लिहले आहे खरच खुप छान त्याला मा झा सलाम.
Dedicate to all office workers.......
Pls share it...

तो अन् ती...

तो अन् ती...
‪#‎LoveStory‬
ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का?
तो: permission काय घेतेस...
विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते मी रे स्तब्ध...
तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...
ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ?
तो: आहे कोणीतरी ...
जी माझी असून हि माझी नाही...
ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?
तो: दिसते ती परी सारखी, अन राहते......
हम्म्म्म.....राहते माझ्या हृदयात...
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग...
पण फुकट पकावू नकोस ..
तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस...
ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी...
मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी...
दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून फक्त मलाच पाहणारी ....
ती: (विचारात गुंग होऊन) कोण असेल ती????
तो: (तिच्याकडे पाहत हसतो, अन मनातल्या मनात बोलतो )
तू समोर असून हि, तुला सांगता येत नाही...
मनातल गुपित माझ्या,का जणू मांडता येत नाही...
घाबरतो ग हरवून बसेन मी तुला,
कारण तुझ्या शिवाय आता मला जगणं जमत नाही....
काही वेळाने तिला कळतं, त्याच्या मनातल गुपित आपोआप उलगडतं,
तो काहीही न बोलता, ती सगळ बोलते,
मैत्रीच्या नात्याला, प्रेमाच नाव जोडते...
कळत नकळतच ते मित्र होतात,
कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...

Friday, May 29, 2015

काच

काच
माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस
.
परिस्थितीच्या काचेवर
एकाबाजूने मी हात ठेवताच
दुसऱ्याबाजूने तू
बोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास
पाणीदार डोळ्यातून
किती बोलली होतीस
तेव्हाच एक धागा विणला गेलेला
त्या काचेच्याही आरपार
.
कीतीदातरी
प्रत्यक्ष आणि फोनवरही
निशब्दातच..
बोललीस माझ्याजवळ
तेव्हा
त्याच नात्यामुळे
त्याच धाग्यामुळे
सहज पोहोचलीस खोल मनात
तुला कळतच असेल, हो ना?
~ तुष्की (तुषार जोशी)

Monday, May 18, 2015

दुखः प्रेमातल्या विरहाचं

दुखः प्रेमातल्या विरहाचं
आज तिलाही कळाल होतं
म्हणूच मिठीत मला तिने
आज स्वतः मध्ये लपवला होतं
~ सुधीर जगताप

स्पर्श ...

तुझ्या जपलेल्या स्पर्शावर पुन्हा 
तुझे नवे स्पर्श विसावतात 
आणि संयमाची घट्टवीण 
ते माझ्या नकळत उसवतात 
~चंद्रशेखर गोखले


Wednesday, April 01, 2015

तू दिलेल्या दुः खाने

तू दिलेल्या दुः खाने
मला बरेचं काही शिकवले
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले…

मागू नकोस

मागू नकोस

मागू नकोस रे तू
आपण जगलेले ते बेभान क्षण
जरा कुरवाळू दे ना मला
ती विलक्षण आठवण

धुंद पावसातली ती
ओली गच्च संध्याकाळ
एकाच छत्रीतून केलेली
ती नशीली वाटचाल

त्या मुसळधार पावसाच्या
बेफाम सरी
अन तुझ्या सहवासाची
ती गोड शिरशिरी

सारं कसं भारलेलं
मंत्रमुग्ध झालेलं
मौनानंच जणू
सारं काही बोललेलं

माझ्या मनात कायमचा
साठवू दे रे तुला
दृष्टीआड होण्या आधी
सारं पुन्हा जगू दे रे मला

-जयश्री अंबासकर