Showing posts with label maitri. Show all posts
Showing posts with label maitri. Show all posts

Monday, January 04, 2016

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....?'

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....?''

आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा .
मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा .
मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा .

मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा .
मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा .

भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा .
मित्र श्रीमंत झाल्यावर आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा .
आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा .

मित्र बिझी असेल, त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा .
आपल्या मित्राची आपण चार-चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण जसा विचार करतो तश्याच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा .

आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा .
खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा .

कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा .
आपले मित्रांशिवाय काही अडत नाही हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा .
आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा .

मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा .

खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते , तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात .
असे असेल ,तसे झाले असेल ...असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो .

मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.
पण कुठेतरी गैरसमज , अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते .

''चांगली मैत्री बनायला
अनेक काळ जावा लागतो
पण मैत्रीमधील धागे तुटायला
एका क्षणाचाही वेळ लागत नाही ''
तेव्हा मित्रांनो ,

तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा .
आणि
तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका —


आपलाच एक मित्र...!!

Wednesday, October 28, 2015

ती म्हणजे मैञी असते...

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला
हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते...

Friday, July 10, 2015

मैत्री म्हणजे काय?

मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम


मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास

मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे

मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं

मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे

मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव

आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी

मनोमेघ

Tuesday, May 27, 2014

Compromise...



Compromise
आयुष्यात प्रत्येकाने अनुभवलेली एक गोष्ट म्हणजे कॉंप्रमाइज़ .... त्यावरच काही ओळी...
आजवर पर्यंत फक्त कॉंप्रमाइज़ करत आलोय
शाळेत असताना सुट्टी संपल्याच कॉंप्रमाइज़
कॉलेज ला गेल्यावर ग्रूप तूटल्याच कॉंप्रमाइज़
शिक्षण संपल्यावर जॉब साठी कॉंप्रमाइज़
आणि जॉब वर तर आपल्या वेळेच कॉंप्रमाइज़
मोठा झल्यावर आवडी निवडी च कॉंप्रमाइज़
सेविंग करायची म्हणून शॉपिंग च कॉंप्रमाइज़
कधी घरच्यान साठी कॉंप्रमाइज़
तर कधी तीच्या साठी कॉंप्रमाइज़
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल..
फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल..
ते म्हणजे आपले मित्र आणि आपला ग्रूप..
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास
बसला नसता की अनोळखी माणसं
सुध्दा रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
जवळची असतात...!!

Tuesday, March 18, 2014