Saturday, June 02, 2007

पुन्हा एकदा पावसात....

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात.
तिची माझी झाली भेट..
त्या ओल्याचिंब दिवसात.....

समोर मी दिवसताच
मना पासुन हसली ती...
उशीर का झाला??? म्हणत,
थोडीफार रुसली ती....

देताच नजर नजरेला..
थोडीशी... ती वरमली.
जवळ ओढून घेताच
थोडीशी....ती शरमली.

बाहेर पावसाची रिपरिप
झोंबणारा वारा
चिंब मनं...चिंब तन...
आसमंत सारा।

अगदी नेमक्या क्षणी,
वीज सुद्धा कडाडली.
मिठी अधिक घट्ट होऊन
ओठापाशी स्थिरावली.

तिच्या ओठांशी.......
माझ्या ओठांचे.......
बंध अचानक जुळुन आले
कुणी तरी रसिकतेने...
त्यालाच चुंबन म्हणाले.

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात..
तिची माझी व्हावी भेट
एका ओल्याचिंब दिवसात

गारवा असाही.....

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.
बघ माझी आठवण येते का..????

यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस.
या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर.
या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये.
घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी.... मेल करताना...
बघ माझी आठवण येते का???

पहिल्या पव्सच्या हर्दीक शुभेचा



पहिल्या पाव्सच्या हर्दीक शुभेचा ...!!!!!!!!!!!!!

Wednesday, May 30, 2007

मराठी गाँधीगीरी

मराठी गाँधीगीरी





ओठांवर आलेले शब्द.......

ओठांवर आलेले शब्द.......


Tuza ani Maza

Kharr-Sangu...

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं
भारलेच डोळे काधी तर ओले आसवांना पुसणारं !
कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालनारे
शाब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देनारं !
कुणीतरी असावे
चंदाणयां च्या बरोबर नेणारं
आंधार्लेया वाटेत आपल्या सोबत येणारं !
कुणीतरी असावे
फुलासरख फुलणारं
फुलता फुलता सुगधं दरवळनारं !
कुणीतरी असावे
आप्लाया मनात रमणारं
पलीकडील कीनार्या वरुन आपली वाट पाह्णारं !

Thursday, May 24, 2007

इस क़दर इंतज़ार करना पड़ेगा

इस क़दर इंतज़ार करना पड़ेगा आपका,
पता ना था
इस क़दर बेक़रार होना पड़ेगा ,
पता ना था
इस क़दर याद आएगी आपकी ,
पता ना था
क्यों गुज़रता है सारा दीन आप्की याद मे
पता है आपको ?
क्यों बेकरार हो जाता हु मई बीन तुम्हारे
पता है आपको ?
क्यों याद आती है आप्की हर पल
पता है आपको ?
ये दूरिया अब सही जाती नही
चले आओ
चले आओ , चले आओ, चले आओ......

Tuesday, May 01, 2007

तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!



जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ! ! ! !