Monday, January 28, 2008

Valu....वाळू :--निखळ मनोरंजन

'Valu' selected for screening at International Film Festival of Rotterdam


देवाच्या नावाने सोडलेला बैल म्हणजे वळू अशी श्रद्धा असलेल्या कुसवडे गावातला वळू सगळ्यांचा लाडका असतो. पण एक दिवस अचानक गावात वेड्या-वाकड्या घटना घडायला लागतात आणि वळू माजल्याची गावकऱ्यांची खात्री पटते. वळूला पकडण्यासाठी गावकरी सर्वतोपरी प्रयत्न करतात पण बैलापुढे सगळे हतबल होतात. वळू कधी भर वस्तीत शिरतो तर कधी देवळात. गावात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीसाठी वळूलाच जबाबदार धरलं जातं. गावातील काही लोक वळूच्या नावावर आपली पोळी भाजून घेऊ लागतात

गावातील सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती आजा (चंदकांत गोखले), सखुबाई (ज्योती सुभाष) आणि वेडी जानी (स्वाती उपाध्ये) या तीन व्यक्ती वगळता सगळं गाव वळूच्या विरोधात उभं ठाकतं. वळूला मारण्याच्या हालचाली सुरू होतात, त्यावेळी याच तीन व्यक्ती त्याला विरोध करतात. मात्र दरम्यानच्या काळात आजाचा शेतात संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याच्या मृतदेहाजवळ वळू सापडतो. या घटनेने गावकरी प्रचंड अस्वस्थ होतात. गावातील सरपंच (डॉ. मोहन आगाशे) पुढे सरसावतात आणि वळू माजल्याची बातमी थेट आमदारापर्यंत पोहोचवतात. त्याचवेळी सरपंचांच्या विरोधात कारस्थानं रचणारा आबा (नंदू माधव) वळूला पकडण्याचा विडा उचलतो. वनविभाग वळूला पकडण्यासाठी एका फॉरेस्ट ऑफिसरची पाठवणी करतात. उच्चशिक्षित, शहरात राहणारा, आपल्या पदाचा प्रचंड अभिमान असलेला जिगरबाज फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकणीर्) कुसवडे गावात येऊन पोहोचतो. एका अत्यंत महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी सोडून स्वानंदला बैल पकडण्याच्या कामी पाठवलं गेल्याने तो प्रचंड नाराज असतो. स्वानंदबरोबर खेड्यातील जीवनावर डॉक्युमेंट्री करण्यास उत्सुक असलेला त्याचा भाऊ समीर (वृषसेन दाभोळकर) हाही येतो. गावात फॉरेस्ट ऑफिसर आणि त्याच्याबरोबर शूटिंगवाले आले आहेत हे कळताच गावात एकच उत्साहाचं वातावरण निर्माण होतं.

काहीशा नाराजीने आलेला ऑफिसर गावात कसा रूळतो ? गावकऱ्यांशी कसा वागतो? वळूला पकडण्यासाठी कशी फिल्डिंग लावतो? गावकरी त्याला कशी साथ देतात? गावकऱ्यांमधील हेवेदावे फॉरेस्ट ऑफिसरसमोर कसे उघडे पडतात? सरपंचांचे विरोधक कशी कारस्थानं रचतात, हुशार फॉरेस्ट ऑफिसर यातून कसा मार्ग काढतो आणि शेवटी वळूला कसा पकडतो, हे पाहण्यासाठी 'वळू' पाहायलाच हवा. गावरान वातावरणात घडणारं हे कथानक अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विनोदाच्या विविध अंगाने उलगडत जातं. प्रत्येक सीनमधून विनोदाची निमिर्ती होते. प्रत्येक पात्राची एन्ट्री कथानकाच्या गरजेनुसार अगदी सहज होते आणि त्यानंतर मात्र सगळी पात्रं धमाल उडवून देतात. निर्माण होणारे विनोद उत्स्फूर्त वाटतात. फॉरेस्ट ऑफिसरचं शहरी शहाणपण आणि गावकऱ्यांचं खेड्यातील तत्त्वज्ञान यांची सुरेख सांगड घातली आहे. सिनेमातील तांत्रिक बाजूही पडद्यामागच्या कलाकारांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका अतुल कुलकणीर्ने चांगली पेलली आहे. या फॉरेस्ट ऑफिसरचा गावातील मदतनीस म्हणून गिरीश कुलकणीर् याने जीवनच्या भूमिकेत जीव ओतला आहे. पंडीत आणि त्याची बायको (दिलीप प्रभावळकर-निमिर्ती सावंत), सरपंच त्याची बायको (डॉ. मोहन आगाशे-भारती आचरेकर), सांगी आणि तानी (अमृता सुभाष-वीणा जामकर), सखुबाई-सुरेशची बायको आणि तानीची आई (ज्योती सुभाष, अश्विनी गिरी आणि मेघना वैद्य), सत्या आणि आबा (सतीश तारे आणि नंदू माधव) या सगळ्या जोड्यांनी चित्रपटात आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. कोणत्याही जगावेगळ्या तत्त्वज्ञानात अडकता कथावस्तू त्यातील भाबडा गावरान टच जपून सहज पुढे सरकत जाते आणि प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाचा आनंद देते.
...............
निर्माते : उमेश कुलकणीर्, गिरीश कुलकणीर्, गणपत कोठारी आणि प्रशांत पेठे, दिग्दर्शक : उमेश कुलकणीर्, कथा-पटकथा : उमेश कुलकणीर्, गिरीश कुलकणीर्.कलाकार: अतुल कुलकणीर्, नंदू माधव, डॉ. मोहन आगाशे, भारती आचरेकर, निमिर्ती सावंत, ज्योती सुभाष, अमृता सुभाष, गिरीश कुलकणीर्, वीणा जामकर, रेणुका दफ्तरदार, सतीश तारे आणि चंदकांत गोखले.

No comments:

Post a Comment