
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
आज नवी व्हावी सारी धरती
अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत
प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा मिळाला आज नवा रंग
रंग रांगात मी असे रंगुनी गेले
मी माझीच न राहता, न माझात उरले
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
ज्योती साळुंखे
Published with Blogger-droid v2.0.6
No comments:
Post a Comment