Monday, November 04, 2013

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
आई, रात्र अधिकच झालीय,
दिव्यातल तेल संपत आलय,
बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे दिव्यांचा झगमगाट,
कोठे फराळाचा सुवास,
आपल्या घरात तर ऐक दाना ही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नव्या कपड्याच्या घड्या,
बाहेर उचं उचं माड्या,
आपल्या झोपडीला अजून दारही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नोटांची पुजा,
तर कोठे सोन्याचे हार,
तुझ्या गळ्यात सोन्याचा ऐक मणी नाही,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

कवी- सुभाष सोनकांबळे,(बेरकी)

1 comment:

  1. नाही रे लेकरा, दिवाळी आपल्यासाठी नाही
    दिवाळी आहे पैसेवाल्यांसाठी ,
    वेतन आयोगांकडून फायदा मिळवणार्‍यांसाठी

    दिव्यांचा झगझगाट, फ़राळाचा सुवास सगळं काही त्यांच्यासाठी
    Food security bill तेवढं आहे आपल्यासाठी …

    ReplyDelete