Thursday, December 18, 2014

तुझी स्वप्न...

सुकलेली पाने पडतात वारा सुटल्यावर ..
तशी तुझी स्वप्न पडतात मी डोळे मिटल्यावर .

एकांत...

एकांत...
एकटेपण बोचतं, असे सारेच म्हणतात.
एकटेपण मला सुखावत,
म्हणून सारे वेडयात काढतात.
त्यांना काय कळणार?
एकटेपणात मनाने दिलेली साथ
त्याच्याच सल्ल्यानुसार मी केलेली प्रसंगावर मात,
त्यांना कस उमजणार?
एकटेपणात मन माझं बोलत,
माझ्या सारया वेदनांवर हळुवार फुंकर घालत!!!

Monday, December 15, 2014

आई

आई

आई हे ईश्वराचे
पवित्र-पावन नाव
माया,प्रेम,आपुलकी
व वात्सल्याने गजबजलेले गाव.

आई हे देवासमोर
सतत जळणारी निरांजन,
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन.

आई हे प्रेम देणारा
अमृताने भरलेला झरा,
मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालणारा वारा.

आई हे वात्सल्याने
काठोकाठ भरलेला सागर,
रसाळ मधुर वाणीने भरलेली घागर.

आई हे मृत्यूवर
मात करणारे अमृत,
सदा आशीर्वाद देणारा
देवतुल्य हस्त.

आसू ...

आसू

Thursday, December 11, 2014

वेड्या क्षणी

वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा ...
~चंद्रशेखर गोखले

Friday, December 05, 2014

माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात...

माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात
एक तू दिसायच्या आधी दुसरा तुला पाहिल्यानंतर
आणि तसं पाहिलं तर दोघात...
फक्त एका क्षणाचं अंतर
~ चंद्रशेखर गोखले

Wednesday, December 03, 2014

|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले

बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित उधळीत जाई पर्णपिसारा

मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल

|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||