Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Saturday, September 29, 2007

मैत्री असावी अशी !!!!!!

मैत्री असावी अशी
मैत्री असावी अशी मैत्रीसारखी
हसत राहणारी हसवत राहणारी
संकटकाळी हात देणारी
आनंदी समयी साद घालणारी
मनाची कवाडे उघडून डोकावणारी
काहीं गुपितांचे राखण करणारी
मन मोकळे करुन सारं सांगणारी
सांगता सांगता मोहीत करणारी
कधी कुणाला न लुटणारी
चांगल्याच कौतुक करणारी
तितकीच चूका दाखिवणारी
शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी