Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thodkyat
Tuesday, May 12, 2015
Wednesday, May 07, 2014
Facebook
सध्या facebook ही गोष्ट आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक होत चालली आहे. याचा नेमका कसा परिणाम होतो याचा आढावा घेणारी ही कविता! (खरे म्हणजे या कवितेच्या शीर्षकातच सारं काही आलं आहे, फार काही लिहिण्याची गरज नाही )
आमचं बुआ आता सगळं virtual होत चाललंय
total friends किती हेच आता real होत चाललंय
उठलं की पहिलं काय तर facebook check करायचं
झोपताना शेवटी काय तर facebook check करायचं
हल्ली आमची संभाषणे , मनातली गुपितं म्हणजे “status” होत चाललयं
हल्ली आमचे आनंद ,दु:ख सारं काही म्हणजे “status” होत चाललयं
गाडी घेतली ,मोबाईल घेतला त्यापेक्षा ,”Likes” किती मिळाले महत्वाचं
एखाद्याची status परत “single” झाली त्यापेक्षा ,”Likes ” किती मिळाले महत्वाचं
(या सगळ्यावर आई /समस्त पालक मंडळींचं मत )
परवा आईच म्हणाली ,आता facebook “join” करायला पाहिजे
रोज तुझ्यासाठीचे, तुझ्याच “wall” वर post करायला पाहिजे
बाबांशीपण chat वर बोलत जा अधून मधून
तिथेच तुझे status updates टाकत जा मधून मधून
आई बाबा म्हणून तिथे relationship कर हो add
तुलाही आठवण होत राहील, आमच्या दृष्टीनं असेना का फॅड
सणाबिणाला सुंदरसं ग्रीटिंग पाठव मला,शुभेच्छांच्या वर्षावांचं
fathers/mathers dayला टाक update भावनांच्या ओलाव्यांचं
मी करेन like सारंच, तसंही मी कधी काही dislike केलंय?
असं समज real मनाच्या request ला virtual मनानं accept केलंय
पल्लवी कदडी

