Showing posts with label Lahanpan. Show all posts
Showing posts with label Lahanpan. Show all posts

Tuesday, June 24, 2014

नसती उठाठेव

लहानपणातील शाळेतली एक कविता
नसती उठाठेव 

जस्सच्या तस्स राहील का सारं...?

जस्सच्या तस्स राहील का सारं...?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...?

धपाट्या बरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे?
रीझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न...काय हे?

सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेले पहिले-वहिले रोप.

ती दिड रुपया भाड्याची सायकल,
ब्रेकडांस व मूनवॉक करणारा तो मायकल.

पुन्हा खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग...?
आणि मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग...?

आवडती छ्त्री हरवेल का परत...?
मोडतील का बेत आल्यावर ठरत...?

शाळेतले मित्र-मैत्रीण परत मारतील का हाक...?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक...?

ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट...?
आउट झाले कारण चांगली नव्हती बॅट...?

"आयसक्रीम" ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं...?
मधल्या सुट्टीत खायला मिळतील का बोरं...?

जस्स च्या तस्स राहील का सारं....?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं...

Thursday, May 29, 2014

दोन जिवलग मित्र, लहानपण आणि शहाणपण

दोन जिवलग मित्र, लहानपण आणि शहाणपण
त्यांच्या मैत्रिचे लोक देत असत उदाहरण

एकावाचून दुसर्‍याला मुळीच करमत नसे
एकाला दुखलं तर दुसरा रडत बसे

लहानपण एकदा खूप मोठं झालं
शहाणपणाशी त्याने मोठं भांडण केलं

लहानपणाला भेटला नवा मित्र अता,
दुसरा कोणी नाही, तो तर वेडेपणा होता

शहाणपणाने सांगूनही लहानपणाने ऐकले नाही
लहानपण सारा वेळ वेडेपणासंगे राही

एक दिवस लहानपण वेडेपणासोबत निघून गेले
शहाणपण स्वतःच मग एकटे राहून वेडे झाले..