Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thodkyat
Friday, February 19, 2016
Thursday, February 19, 2015
१९ फेब्रुवारी : श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले" जयंती
जय शिवराय...
जय शिवराय...
Friday, June 06, 2014
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आज शिवराज्यभिषेक दिन
शिवराज्याभिषेकदिन म्हणजे मराठ्यांना, त्यांच्या राज्याला, स्वातंत्र्य व सार्वभौमत्व देणारा दिवस होय.
सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचे स्मरण आपण दरवर्षी रायगडावर येवून करत असतो. लोकशाही भारतात आपले राष्ट्र सार्वभौम राहावे यासाठी आपण सतत जागरूक असतो. त्याकामी रायगडावरील हा शिवराज्याभिषेक सोहळा सतत प्रेरणा देत राहील.
महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा....
।।जय भवानी जय शिवाजी ।।
।।जय भवानी जय शिवाजी ।।
।। जय महाराष्ट्र ।।
#मराठी #शिवराज्याभिषेक #ShivajiMaharaj #Marathi
Thursday, May 15, 2014
Thursday, April 03, 2014
राज़े रक्ताच्या प्रत्येक थेबां थेबांतुन तुम्हाला मानाचा मुजरा
आज ३ एप्रिल इतिहासातील काळा दिवस.
राजे तुमच्यासाठी प्रत्येक उभा मावळा रडला
संपुर्ण सह्याद्रीसह महाराष्ट्र अश्रुनी भिजला आज
राजे आज प्रत्येक गड रडला
प्रजा झाली पोरकी राजा विनातरी
राजे नाय सोडली तलवार हातातुन
लढलो तुमचा आर्शिवाद घेऊन.
आमचा देव गेला आम्हा सोडुन तरीही राजे आपण मनात अखंड जीवंत आहात अन यापुढे ही असाल
राज़े रक्ताच्या प्रत्येक थेबां थेबांतुन तुम्हाला मानाचा मुजरा
जय जिजाऊ
जय शिवराय
Wednesday, March 19, 2014
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ...
दीन-दलितांचा कैवारी जन्माला...
दृष्टांचा संहारी जन्मला...
अरे माझा राजा जन्मला..."
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...
सर्व शिवभक्तांना "शिवजयंतीच्या" हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..
Wednesday, February 19, 2014
Monday, January 13, 2014
माँ साहेब जिजाऊ यांची आज जयंती
कोटि कोटि नमन ।।
आजच्या या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली.
हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता-रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्यामध्ये शिवबा घडवला.
स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने
शिवाबंसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला...
Saturday, November 02, 2013
दिवाळी आली की...
दिवाळी आली की, वाटतं राजा तू आहेस,
तू अजुनही जीवंत आहेस . . .
प्रत्येक अंगणात तुझे गडकिल्ले उभे राहतात
त्याला खिंडारे नसतात,
ना भग्न अवस्थेतले तुझे राजवाडे असतात,
असतं ते फक्त चैतन्य ... नव्या उमेदिनं
सळसळणारं ...
मशाली, चिरागदाने, शामदाने नसतातं,
पण असतात पणत्या तुझ्या मांगल्याचं स्वरुप
सांगणार्या,
गड बांधताना एक-एक
चिमुकला अभियंता आपापली विचारशक्ती ला चिखलाने
माखलेले हात, बरबटलेले कपडे,
पण तोंडावर तेज विलसत असतं,
एक भावना मनात ज्वलंत असते,
की "हो राजा तुला बसायला,
तुझा रुबाब अन् थाट दिसायला,
तुला विराजमान व्हायला एकच एक
जागा ह्या भूतलावर आहे, ते म्हणजे
गडकोट,
आणि ती मी जागा निर्मीली आहे,
माझ्या अंगणातल्या गडावर माझ्या राजाचं
वास्तव्य
असेल, माझ्या गडाचा मीच हिरोजी इंदुलकर!!!
याहून माझ्यासाठी आनंदाची दुसरी गोष्ट
नाही !!"
आणि हे सारं पाहताना तुझे डोळे आकाशात
पाणावले
नसतील तर नवल! आणि एक वाक्य
त्या गडकर्याच्या मनात
नेहमी गुंजत राहिल,
"उभाच राहिन मी सांगेन
गाथा तुझ्या पराक्रमाची,
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या ईतिहासाची" !! जय भवानी !!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभूराजे !! शिवभक्त










