Showing posts with label Shravan. Show all posts
Showing posts with label Shravan. Show all posts

Thursday, August 20, 2015

श्रावण

निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण

तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण

तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण

मस्त हवेच्या मौसमाने
या मनास मुक्तछंद लावेल श्रावण

हर्ष-उल्हास देईल श्रावण
फ़ुलण्याची नवी आस होईल श्रावण

हिरव्या नवलाईच्या शालुने
आज या धरणीस सजवेल श्रावण

ह्रुदयातली आग विझवेल श्रावण
प्रेमळ सरींनी भिजवेल श्रावण

काल नयनातुन बरसणा-या
थेंबालाआज नभातुन बरसवेल श्रावण
श्रावणाच्या हार्दीक शुभेछ्चा.................

- सचिन काकडे

Wednesday, August 07, 2013

Shravan Aala... श्रावण आला !!

श्रावण आला !!
श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

Wednesday, August 01, 2012