Showing posts with label Vithala. Show all posts
Showing posts with label Vithala. Show all posts

Wednesday, July 01, 2015

| बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल |

" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल |
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल ||१ ||
माता विठ्ठल, पिता विठ्ठल |
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ||२ ||
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल |
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ||२ ||
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला |
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ||४ ||


" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "

Wednesday, July 09, 2014

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा




|| टाळ वाजे, मृदंग वाजे,
वाजे हरीची वीणा. ||
||माऊली निघाले पंढरपूरा..,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ||
|| जय जय राम कृष्ण हरी ||
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Friday, July 19, 2013

Thursday, July 18, 2013

विठ्ठल गीती गावा , विठ्ठल चित्ती ध्यावा ।

विठ्ठल गीती गावा , विठ्ठल चित्ती ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ।। १ ।।
अनाथांचा बंधू विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाशा ।।२।।
तोचि शरणागता विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संता समागमे ।।३।।
विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी ।

 लागली समाधी विठ्ठल नामे ।।४।।
विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख ।
गोडवले मुख तुका म्हणे ।।५।।