Wednesday, January 26, 2011

Prajasattak Din...प्रजासत्ताक दिन...

काही लोक विचार करत असतील आपण देशभक्त आहोत हे अनुभवण्या साठी आपल्याला काही विशिष्ट दिवसच का हावेत ...?
माझ्या मते तरी ते खूप गरजेचे आहेत, कारण आपण आता हळूहळू विसरलो आहोत कि २६ जनवरी आणि १५ ऑगस्ट  हे दिवस बघण्याची स्वप्ने बघत, किती यातना सोसत लोकांनी आपले बलिदान दिले होते.
या दिवसांन बद्धल सन्मान असणे किव्हा या दिवशी का होईना आपल्या देशभक्ती ची अनुभूती होणे हे त्या वीर स्वतंत्र सैनिकांना  आपली श्रद्धांजलि अर्पण केल्या सारखेच आहे .
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!


Prajasattak Din...प्रजासत्ताक दिन...

Prajasattak Din...प्रजासत्ताक दिन...

Tuesday, January 25, 2011

Friday, January 21, 2011

Monday, January 10, 2011

Prem Tujha Khara Asel Tar.... प्रेम तुझं खरं असेल तर....

Prem Tujha Khara Asel Tar....

प्रेम तुझं खरं असेल तर.... 

 

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.
 

Wednesday, January 05, 2011