Saturday, July 28, 2012

प्रेम...Prem...

प्रेम फक्त नाद आहे
अनुभवला तर साद आहे
दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे
आत असेल तर जगणं आहे
बाहेर गेला की प्राण आहे


Wednesday, July 25, 2012

जीवन हे एक रम्य पहाट!

जीवन हे एक रम्य पहाट!
जीवन हे एक रम्य पहाट!
संकटांनी गजबजलेली एक वादळवाट!
सोनेरी क्षणाची एक आठवण!
सुख दुःखाचं ते एक गोड कालवण!
प्रेमाच्या पाझरांची वाहतीएकसरीता!
नात्याच्या अतुट शब्दांनी गुंफलेली एक कविता!
जाणिवेच्या पलीकडचं एक जगावेगळं गांव!
यालाच आहे जीवन हे नांव!

Monday, July 16, 2012

खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !

Khatri Aahe Ki Tu Mala Nakki Ho Mhanshil !
खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !

Sunday, July 15, 2012

Tu Apla Mhanalis... तु आपलं म्हणालीस...


तु आपलं म्हणालीस आणि ,
जग माझं बदलल .
सगळं काही मीळlल ,
स्वप्नं सत्यात उतरल .
झुरत होतो तुझ्यासाठी , मरतहोतो तुझ्यासाठी ,
कळत होता वेडेपणा तरी ,
तसेच वागत होतो तुझ्यासाठी.
तु आपल म्हणालीस आणि ,
जग माझे बदललं .
सगळ काही मीळlल, आयुष्य माझंपालटल .
क्षणो क्षणी , ओढ़ होती
क्षणो क्षणी बैचैनी ,
मनामध्ये शिरली होती
तुझीच ती धुंदी .
तु आपल म्हणालीस , आणि सुख मला मीळlल .
हवे होते जसे मला
उत्तर तसेच मीळlल .
तु आपलं म्हणालीस आणि
जग माझं बदललं .
सगळं काही मीळlल मन आनंदाने भरलं .
किती स्वप्नं पहिली होती
किती कल्पना रंगवल्या होत्या
तुझ्या विचlरने सखे
रात्र रात्र जागवल्या होत्या
स्वप्नातून सत्यात तु आलीस आणि मन माझं खरं
ठरलं
तु आपलं म्हणालीस आणि
जग माझं बदललं ...


Tuesday, July 10, 2012

बाकि........ मी मस्त आहे ....

हो, तू नाहीस म्हणुन
मन जरा अस्वस्थ आहे
होऊ दे त्याला काहीतरी
मी माझ्या कामात व्यस्त आहे
बाकि........ मी मस्त आहे ........
हो, श्वासही कोंडतो कधी कधी
त्याच्यावारही एकतेपनाचा ताण आहे
होइल कधीतरी सरळ,
त्यालाही वस्तुस्थितिचे भान आहे
बाकि, मी एकदम छान आहे .........
तू आठवण करून द्यायचिस
की मला झोप येत आहे
आता नाही येत, नकोच ती!
भलत्या स्वप्नांवर ही मात आहे
बाकि, मी मजेत आहे ................
गालांवर, डोळ्यांच्या खालि,
ओलावा आहे, फार बोचरा आहे
पण असू दे, कारण त्याच्या प्रत्येक थेम्बात
तुझाच हसरा चेहरा आहे
म्हणुन मी तसा बरा आहे .............
.
मी कसा का असेना,
बोलुन चालून एक विझलेली राख आहे
तू कशी आहेस ग??
बस्स, तेवढीच एक रुखरुख आहे

Monday, July 09, 2012

Premacha Sugandh



प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
आज नवी व्हावी सारी धरती
अन  समुद्राला हि यावी प्रेमाची भरती
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत
प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा  मिळाला आज नवा रंग
रंग  रांगात मी असे  रंगुनी गेले
मी माझीच  न राहता, न  माझात  उरले     
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा 
                 
    ज्योती साळुंखे
Published with Blogger-droid v2.0.6

Saturday, July 07, 2012

Thursday, July 05, 2012

Tuesday, July 03, 2012

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुपोर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरः l
गुरु: साक्षात् परब्रम्ह
तस्मै श्रीगुरुवे नमः

Monday, July 02, 2012

मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून
घेतो.. मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर..
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात..
मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील.?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ
मैत्रीची जात..
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर
कळला..
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख- दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री