Tuesday, July 15, 2014

सौ चा वाढदिवस... पु ल देशपांडे

सौ चा वाढदिवस... पु ल देशपांडे

Aanand... आनंद

Aanand... आनंद

संकष्टीच्या हार्दीक शुभेच्छा.





तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या
कानाइतका विशाल असावा..
अडचणी उंदराइतक्या लहान
असाव्यात..
आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे
गोड असावेत..
बाप्पाच्या चरणी तुमच्यासाठि प्रार्थना..
बाप्पाच्या चरणी तुमच्या सर्वांनसाठि प्रार्थना...

॥ ॐ श्री गणेशाय नमं ॥
संकष्टीच्या हार्दीक शुभेच्छा.

Friday, July 11, 2014

पाउस

पाउस

पाउस कोसळतो छपरावरती
त्यावरुन सांडती हजारो मोती
काही माझ्या गाली पडती
काही करती गंधित माती

पाउस कसा हा
अल्लड खेळातो
कधी पानांतून
तर कधी मनातून झरतो

मनातील गाणे
पाउस जाणतो
अबोल शब्दांना तो
सुर लावतो

मन माझे एकाकी
पाउस त्याला वेड लावतो
नाही कुणी येणारे जरी
उगा मिलनाची ओढ लावतो

थोडा खुलवतो
थोडा झुलवतो
आकांक्षांना तो पंख लावतो
ओंजळीत साठलेल्या तळ्याकाठी
स्वप्नांचे तो गाव बांधतो

पाउस येतो
पाउस जातो
मनाचे रितेपण तसेच राहते
आंतरिच्या अश्रुंमधुन
पावसाचेच गाणे उमटते

---- प्रसाद कोलते

Wednesday, July 09, 2014

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा




|| टाळ वाजे, मृदंग वाजे,
वाजे हरीची वीणा. ||
||माऊली निघाले पंढरपूरा..,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ||
|| जय जय राम कृष्ण हरी ||
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Thursday, July 03, 2014

Nivdak Pu La

Nivdak Pu La

आलो आहे आता मी....

आलो आहे आता मी....

आलो आहे आता मी
मनसोक्त भिजून घे
पुन्हा लिही कविता माझ्यावर
हातात ती लेखणी घे


कोसळत्या सरींबरोबर
भाजक्या मक्याचा आस्वाद घे
छत्री दे भिरकावून
अन् हवं तेवढं बागडून घे

चिखलातून चालताना
पँट थोडी सावरून घे
घरी पोहोचायला उशीर होईल
रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे

गॅलरित बस निवांत
काॅफी आणि कांदाभजी घे
वाफांचं आणि सरींचं काँबिनेशन
समजत असेल तर समजून घे

असेल नसेल कोणी सोबत
तर त्यांनाही सामावून घे
भिजण्याची आवड नसेल
पण थोडं ईतरासाठी भिजून घे

छप्पर गळेल घराचं
ताडपत्रीवर तोंडसुख घे
माझ्या कोसळण्याचे बोल
मलाच लावण्याचंही सुख घे

पुन्हा मी निघून जाईन
हवं तेवढं ओंजळीत भरून घे
वर्षभर साठवून ठेवायचंय तूला
आज मात्र थोड्यावरंच भागवून घे