Friday, October 24, 2014

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...!!

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

आई, रात्र अधिकच झालीय,
दिव्यातल तेल संपत आलय,
बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

कोठे दिव्यांचा झगमगाट,
कोठे फराळाचा सुवास,
आपल्या घरात तर ऐक दाना ही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

कोठे नव्या कपड्याच्या घड्या,
बाहेर उचं उचं माड्या,
आपल्या झोपडीला अजून दारही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

कोठे नोटांची पुजा,
तर कोठे सोन्याचे हार,
तुझ्या गळ्यात सोन्याचा ऐक मणी नाही,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...!!

(( दिवाळीत कपडे फटाके तर सरवच घेतात पण एक दिवाळी अशी Celebrate करा की ती तुमच्या व दुसर्यांचा लक्षात राहिल ))

Wednesday, October 22, 2014

आज नरकचतुर्दशी !

आज नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो!

आठवणीतली दिवाळी

आठवणीतली दिवाळी

एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!

फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!

'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.

आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?

ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ
झाली !!

Tuesday, October 21, 2014

धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
 या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Monday, October 20, 2014

दुखं प्रेमातल्या विरहाचं ...

दुखं प्रेमातल्या विरहाचं ...

आज वसु बारस...

आज वसु बारस...
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
http://www.baalpan.com/festival/vasubaras#sthash.X65KUMqy.dpuf

Saturday, October 18, 2014

तुझ्या भेटीची ओढ

तुझ्या भेटीची ओढ

तुझ्या भेटीची ओढ
प्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते
मला फक्त एकाच सांग....
सांग न असे का होते

तुझ्याशी बोलताना काळातच नाही
वेळ कसा निघून जातो
क्षण हा येथेच थांबवा
मनोमन हेच वाटत राहत

वेड मन माझं
त्याला समजू किती
तू येऊन गेलास तरीही
वात पाहत राही तुझीच

क्षणाचाही दुरावा
सांग का वाटतो युगासारखा?
कल्पनेतही आहे अश्यक्य
आता जगणे तुझ्या विना.....

"श्वेता पोहनकर"

Tuesday, October 14, 2014

रुसवा

रुसवा
रुसण्यात काय हर्ष आहे हसण्यात ही फसून जा
गुलाम आहे तुझाच मी राणी पुन्हा बनून जा

आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा

लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा
विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला

एकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा
जेडी

Thursday, October 09, 2014

तू दिसल्यावर जे मला आठवतं

तू दिसल्यावर जे मला आठवतं
तेच तुला आठवत असेल मला पाहिल्यावर
दोघांच्या मनात आता एकच प्रश्न....
नक्की काय बोलायचं समोर उभं राहिल्यावर...
~ चंद्रशेखर गोखले.

Saturday, October 04, 2014

चहा…! की कॉफी…!!

मला हे comparison आवडले.

चहा…!  की  कॉफी…!!

चहा म्हणजे उत्साह..,
कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..,
कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..,
कॉफी अक्षरशः निवांत...!

चहा म्हणजे झकास..,
कॉफी म्हणजे वाह मस्त...!!

चहा म्हणजे कथासंग्रह...,
कॉफी म्हणजे कादंबरी...!

चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
कॉफी एक धुंद संध्याकाळी...!!

चहा चिंब भिजल्यावर...,
कॉफी ढग दाटुन आल्यावर...!

चहा = discussion..,
कॉफी = conversation...!!

चहा = living room....,
कॉफी = waiting room...!

चहा म्हणजे उस्फूर्तता...,
कॉफी म्हणजे उत्कटता...!!

चहा = धडपडीचे दिवस...,
कॉफी = धडधडीचे दिवस!...!

चहा वर्तमानात दमल्यावर...,
कॉफी भूतकाळात रमल्यावर...!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची...!!! 

Friday, October 03, 2014

दसरा....

दसरा....
या दिवशी म्हणे सोनं वाटतात...
एवढा मी श्रीमंत नाही....
पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
ईश्वराकडे माझी एकच प्रार्थना.....
'तुमच्या रूपाने असलेले माझे सोने सदैव उजळत राहो...'

दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!
आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

Thursday, October 02, 2014

दसरा रम्य उत्सव प्रेमाचा !

रम्य सकाळी, किरणे सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजीरी,
उमलगे आनंद मनी,
जल्लोष हा विजयाचा हसरा
रम्य उत्सव प्रेमाचा
तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....

झेंडूची फुलं केशरी केशरी,
वळणावळणाच तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृत्कृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमी ची रीतच न्यारी....||

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....

आईसक्रीम..

जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ खावा लागतो,
ते म्हणजे आईसक्रीम..

आ-आत्मविश्वास
ई-ईच्छाशक्ती
स-सकारात्मक द्रुष्टीकोण
क्रि-क्रियाशीलता
म-महत्वाकाँक्षा..

देवा त्याला माफ कर ...

देवा त्याला माफ कर ...

Wednesday, October 01, 2014

खरच काही मुले असतातच असे...

खरच काही मुले असतातच असे...

खरच काही मुले असतातच असे,.
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम
करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत
असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे...

मुले असतातच असे,.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे...

मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...

खरच काही मुले असतातच असे,.
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणार....