Friday, February 27, 2015

२७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिवस

" मराठी राजभाषा दिवस " सर्वाना हार्दिक शुभेच्छा....
प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करतात. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’ पाळण्याची प्रथा सुरू झाली
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.!
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी".!!


Thursday, February 26, 2015

स्वप्न

"एखाद स्वप्न पाहण , ते फुलवण , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडण , त्या धडपडीतला आनंद लुटण आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच !"
- वी . स. खांडेकर

Tuesday, February 24, 2015

पोरा …

पोरा …

Maitri ... मैत्री...

Maitri ... मैत्री...

आयुष्य नावाच्या शाळेत

आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे
मुलांची हजेरी घेणं सुरु आहे
इयत्ता ४०( म्हणजे वय वर्षे चाळीस किंवा जास्त )
संताप : हजर
अस्वस्थता : हजर
निरसता : हजर
हट्ट : हजर ( मोठ्याने ओरडून )
नैराश्य : हजर
कर्जाचे हप्ते : आहे मी बाई
कटकटी : हजर
दु:ख : आहे
काळज्या : हजर
अनुभव : बाई मी रोज रोज येतो
आनंद : ?,
आनंदऽ ? ? ?
आनंद : नाही आहे
शांतता : नाही आहे
समाधान : बाई त्यांनी शाळा सोडली

Thursday, February 19, 2015

१९ फेब्रुवारी : श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले" जयंती

१९ फेब्रुवारी : हिंदुस्तानात स्वांतंत्र्याची अखंड मशाल पेटवणारे,स्वातंत्राची नवी उर्मी जागृत करणारे,पराक्रम व देशप्रेमाची जाज्वल्य परंपरा निर्माण करणारे,रयतेवर जीवापाड माया करणारे,३५० वर्षानंतरहि १२५ कोटी देशवासीयांच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त झालेले "अखंडलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री महावीर महापराक्रमी श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले" यांच्या जयंती निम्मित सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेछा
जय शिवराय...
जय शिवराय...


Wednesday, February 18, 2015

स्वाईन फ्लू बद्धल अत्यंत महत्वपूर्ण माहिती.

स्वाईन फ्लू बद्धल अत्यंत महत्वपूर्ण माहिती. कृपया वाचा आणि सर्वानबरोबर share करावी ही विनंती . धन्यवाद.






पेनची नळी!!

जि.प. शाळेबाबत अज्ञात व्यक्तीने घेतलेला सुंदर अनूभव
पेनची नळी!!
पुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो ...
एक १२ /१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याच जाणवलं ....
चहापान झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती ...
गाडीपासून २०/२५ फुटावर झाडाच्या अडोस्याला 'तो' उभा होता..
नजर माझ्याकडे.
मी त्याला जवळ बोलावलं ..
"भूक लागली का?" विचारल
तो मानेनच नाही म्हणाला ...
माझी उत्सुकता वाढली ...
"पैसे पाहिजेत ??"
"नाही."
"मग.??"
पाठीमागे लपवलेली पुष्ट्याच्या प्याड, निबंधाची वही अन रिफील संपलेला रुपयाचा पेन ( use & throw ) त्यान दाखवला.
.."पेनची नळी संपली ...
घेऊन द्या न ..!!"
मी ५ रुपये दिले.
तो .."पैसे नको नळी घेऊन द्या"
मी म्हटलं "का?"
तो "माझी माय म्हणली कुणा कडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही
....मी जितके फुकटचे पैसे घेइल तितक माझ्या मायच आयुष्य कमी हुइल .!!!!
त्याच उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं..
माझी माणुसकीची नशा...खाडकन उतरली ..
दातृत्वाच ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.
मी गाडीतून उतरलो ...त्याच नाव विचारल ..बंड्या .
बंड्या मला टपरी कडे घेऊन गेला ..
पेन घेतल्यावर बंड्या खुलला
माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. .
मी :- कितवीत आहेस ?
बंड्या:- मराठी ७ वित ...
मी :- काय लिहितोस ???
बंड्या :-निबंध... माझी आई !!!!
मी :- कुठ राहतोस ?
बंड्याने शेताकड बोट दाखवलं ...लांब वर एक झोपडी दिसत होती ..बंड्याचा बाप शेतावर
जागल्या होता.. आई शेतावर मजुरी करत होती ..बंड्याला चार लहान भावंड होती.
मी वही हातात घेऊन चाळली...
बंड्या झेड पी च्या शाळेत होता.
त्याच पूर्ण नाव वाचल.
अन मग विचारल "माझ्याकडच नळी का मागितली ..?"
बंड्या गांगरला ..
मी परत विचारल "इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडच नळी का मागितली.?"
बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .!!!"
मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते .काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ..
बंड्याचे निरीक्षण अचूक होते ...
माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता .
मी : "तुला कोण व्हायचं ?मोठा झाल्यावर .
बंड्या : "फौजदार !!!"
मी : "फौजदार ? कसा काय ?? कुणी सांगितलं .??"
बंड्या : "मास्तर म्हणले कि मी खूप अभ्यास केला कि फौजदार होईल ... !!"
मला त्याच उत्तर आवडल ...!!
माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते ...!
स्वताच्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्कारशी जोडणाऱ्या त्या माउलीला
अन
निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याच स्वप्न देणाऱ्या झेड पी च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला.!!!.
माझ्या खिशाचा आवडता पेन काढला ... बंड्या च्या खिशाला लावला.!
त्याच्या खांद्यावर हात ठेवला ..अन माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरसी शेकह्यंड करून गाडीत बसलो.!!
गाडी निघाली ...बंड्या च्या डोळ्यात चमक आली होती !!!
बंड्या बराच वेळ गाडीकडे बघत हात हलवत होता ...!!.
मी निश्चिंत होतो ........
कितीही भ्रष्टाचार वाढो...…
माझ्या देशाच भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली ……!!

Tuesday, February 17, 2015

उपवास... एक मनोगत !!

उपवास... एक मनोगत !!

दरवर्षी महाशिवरात्रीला मी नित्यनेमाने उपवास करतो.... अगदी कडक उपवास करतो... .सकाळी फक्त दूध घेतो !!

आता बाहेर पडताना ,आईने राजगिरा लाडू घे म्हणून नाट लावली... म्हणून फक्त चारच लाडू खाल्ले... ते सोडून द्या... लाडूने तोंड गोड झालं म्हणून थोडे शेंगदाणे घेतले इतकंच !!

बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

सकाळी सकाळी मंदीरात गेलो.... महादेवाचे दर्शन घेतले... तिथे प्रसाद म्हणून साबुदाणा थालीपिठ आणि शेंगदाण्याची ओली चटणी होती.... साक्षात महादेवाचा प्रसाद नाकारणे शक्यच नव्हते.... म्हणून गरम गरम मोजकी तीनच थालीपिठे घेतली... नंतर मंदीरातील महाराजानी स्वत:च्या हाताने दोन केळी दिली... साधू पुरुषासमोर विनम्र होउन त्यांचा आदेश शिरसावंद्य मानायचा हे घरातले संस्कार.... केवळ केळी खाल्ली !!

बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

म्हटलं आता रोजच्या कामाला लागू या ... तीन तासात कामं हातावेगळी केली... दुपार झाली... एका मित्राचा फोन आला म्हणून त्याच्या घरी गेलो... त्यांचा फराळ चालू होता... म्हणून मी म्हणालो ,नंतर येतो... वहिनी म्हणाल्या ,'भावजी बसा... थोडा फराळ करा....रताळ्याच्या चकल्या केल्या आहेत... साखर पाकातल्या... जरा महाशिवरात्रीचं पुण्य घेऊ द्या आम्हाला !!' आता झाली ना पंचाईत ?? आयुष्यात आपण कुणाच्या पुण्याच्या आड कधी आलो नाही.... .शेवटी संस्कारी घरातला मुलगा आहे... संस्कार वाया जाउ दिले नाहीत.... रताळाच्या चकल्या खाल्ल्या इतकंच !!

बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

अजून घरी जायचं आहे... घरच्या अन्नाचा मान राखायचा आहे... त्यानंतर सायंकाळपर्यंत एक कण सुद्धा पोटात जाउ देत नाही !!

कारण आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

महशिवरात्रीच्या शुभेच्छा !!

|| महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ||

|| महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ||
------------ हर हर महादेव ------------

कुणी भेटलंच नव्हतं …

कुणी भेटलंच नव्हतं …

Saturday, February 14, 2015

"जमेल तसे प्रत्तेकाने ...कुणावर तरी प्रेम करावे ...

"जमेल तसे प्रत्तेकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे ...

कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!

प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!

आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!

प्रेम पुत्री व पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!

प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!

शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र हि करावे !

प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!

महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!
.happy valentines day 💕