Thursday, June 30, 2016

आणि कमी आहे फक्त तुझी



मुसळधार कोसळणारा पाऊस
सोबत दर्द रफीजींच्या आवाजातला
आणि कमी आहे फक्त तुझी

रिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा
खमंग भजी चहा बशीतला
आणि कमी आहे फक्त तुझी


कडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा
समोर तरळणारा प्रसंग आठवणीतला
आणि कमी आहे फक्त तुझी

छतावरून गळणारे टप टप थेंब
ओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला
आणि कमी आहे फक्त तुझी

प्रज्ञा रायकर जोशी

Wednesday, June 22, 2016

सांजेच्या काठावरती

सांजेच्या काठावरती
अलवार क्षणांच्या भेटी
ही प्रीत आपली आहे
की शतजन्मांच्या गाठी...
कोणती तपस्या केली
ज्याने तू माझी झाली
आयुष्य घेतले माझे
थरथरत्या पदराखाली...
एकांत भावतो मजला
जो तुझी आठवण देतो
हा तुझ्या दिशेचा वारा
येतो अंगास बिलगतो...
एवढा दुरावा असुनी
भेटतो मनाने आपण
मग कायेवरती चढते
नाजुक स्पर्शांचे लेपण..
बोटाने नाव गिरवतो
वाळुत मुलायम ओल्या 
तू दिसते नावामध्ये
मन कातर झाल्या झाल्या...
ओंजळीस आयुष्याच्या
तू ओंजळ लाव तुझीही
पेटता दिवा प्रेमाचा
नाही विझणार कधीही...
-- संतोष

*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,*



*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,*
*हैरान हूँ मैं*
*तेरे मासूम सवालों से,*
*परेशान हूँ मैं.....*


किती वर्ष झाली हे गाणे ऐकतोय/बघतोय पण, कधी पण हे गाणे ऐकताना वेगळाच आनंद मिळतो. कधी गुलजार यांची शब्दरचना, त्याच्यातील तरलता आणि सहज सुंदर शब्द तर कधी आरडींचे संगीत आणि या दोघा दिग्गजांना तितक्याच ताकदीने साथ देणार्या गायकांची कमाल...
लता मंगेशकर आणि अनुपजींची.....

मला अनुपजींचे हे गाणे जास्तच आवडते. त्याला कारण आहे त्याचे पिक्चरायझेशन्स खुप छान झाले आहे. नसिरुद्दीन आणि निळ्या डोळ्याचा निरागस मुलगा आणि त्या गाण्यातील दर्द अनुपजीनी सही गायला आहे.
एखादा सिनेमा हा वर्षानुवर्षे लक्षात रहातो आणि ताजातवाना वाटतो आणि आताच्या काळाशी सुध्दा सुसंगत वाटतो, त्यातीलच *'मासुम'* हा सिनेमा. अभिनय, संगीत, संवाद आणि डायरेक्शन्स याबाबतीत तर लाजवाब.
*या गाण्यातील प्रत्येक ओळ, शब्द हे मनाला हलकेच स्पर्श करतात आणि जीवनाचा अर्थ तपासुन पहायला भाग पाडतात.*

तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,
हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से,
परेशान हूँ मैं.

खरच आपल्या आयुष्यात असे किती तरी वेळा असे साधे-साधे प्रश्न येतात, ज्याची आपण उत्तरे शोधायची प्रयत्न करतो ....
कधी मिळतात तर कधी तसेच सोडुन द्यावे लागतात ......

जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है

प्रत्येक माणसाची राहिलेली काही स्वप्न, काही ईच्छा किंवा काही झालेल्या चुका..... ज्या आपल्याला बरोबर घेऊन आपले आयुष्य हे जगावेच लागते आणि मग कधी कधी अचानक जगता जगता लक्षात येते कि आपण जे हे हसतो आहोत, आनंद घेतो आहोत याचे देणे आपण एकतर दिलेले असते किंवा द्यायचे बाकी असते. अशी काही दुखे असतात की आपल्याला ती बरोबर घेऊन सर्वांपासुन लपवुन हसत हसत जगावेच लागते ....
जणु काही हा दु:खे म्हणजे, जगण्यासाठी घेतलेली कर्जच असतात. अन् ती फेडावीच लागतात .

ज़िन्दगी तेरे गम ने हमें
रिश्ते नए समझाए
मिले जो हमें धूप में मिले
छाँव के ठन्डे साये

किती सुंदर कडवे आहे, हे अगदी खरय आपल्या आयुष्यात येणार्या दु:खानीच आपल्याला खरी नाती लक्षात येतात. उन्हामध्ये जश्या थंड सावलीचे भास होतात तसेच या काळात खोटी सहानुभूती दाखवणारेच जास्त भेटतात.

आज अगर भर आई है
बूंदे बरस जाएगी
कल क्या पता किन के लिए
आँखें तरस जाएगी
जाने कब गुम हुआ कहाँ खोया
इक आंसू छुपा के रखा था

आज असे वाटते की ज्या भावना मी जगापासुन लपवुन ठेवल्या आहे त्या आज बरसुन जातील ... तर काय सांगता येते कुणाच्या येण्याची वाट बघता बघता हे डोळे शुष्क होउन जातील ..... या साठीच एक अश्रू लपवला होता, काय माहिती तो हरवला कि गायब झाला.... !!!!

असे हे सगळे सहन करत आनंदाने *जगायचे असते* .....
*जगायचे असते.*

*(आयुष्य एक प्रवास )* 🔅🔆🌻

Monday, June 13, 2016

सुंदर काय असते

सुंदर काय असते

रिमझिमत्या सरी

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन
वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते,
लगेच कविताच सुचायला लागतात..!!!
- स्पृहा

डोळे भरून आले की..

डोळे भरून आले की..
तुझं रूप कसं दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हातानी कोणी पुसायला लागतं

- चंद्रशेखर गोखले

Friday, June 10, 2016

तुला म्हणून सांगते ....

तुला म्हणून सांगते .....

पुन्हा पुन्हा शहारते, तुला म्हणून सांगते,
मिठीत वेड वाढते, तुला म्हणून सांगते .....

जिथे जिथे खुणा तुझ्या, वसंत पेरतो सख्या,
तिथेच मी विसावते, तुला म्हणून सांगते......

तुझी प्रिया तुझ्यासवे, नभात झेप घ्यावया,
गगनझुलाच मागते, तुला म्हणून सांगते ....

नजर कधी न लागण्या, तुला कुण्या सुरंगिची,
इथून दृष्ट काढते, तुला म्हणून सांगते.....

तुझे अबोल राहणे, दिशात शून्य पाहणे,
क्षणात मौन वाचते, तुला म्हणून सांगते....

धुक्यास पांघरून मी, तनामनास जाळते,
दवात रात जागते, तुला म्हणून सांगते......

तुझ्याच आरशातला, चुकार चेहरा पुन्हा,
नव्या ऋतूत पाहते, तुला म्हणून सांगते ......

माधुरी

Thursday, June 09, 2016

माझ्यासारखच तिचंही होतं

माझ्यासारखच
तिचंही होतं
गप्पा रंगात आलेल्या असताना
समोर घर येतं
- ‪‎चंद्रशेखर गोखले‬

Wednesday, June 08, 2016

प्रेम कधीच अधुरे राहत नाही

प्रेम कधीच अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी,
राजा पासून दुरावलेली
एक राणी...

Tuesday, June 07, 2016

तुझ्यासाठी....

तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही
तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही
अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी

तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो
प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो
हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी

आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला
खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला
आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी

तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी

हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही
तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही
तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी

एक एकटा एकटाच