Showing posts with label Mann. Show all posts
Showing posts with label Mann. Show all posts

Monday, July 20, 2015

आपण प्रथम भेटलो तेथे

आपण प्रथम भेटलो तेथे
मन माझं पुन्हा पुन्हा फिरून जातं
सा-या खुणा तशाच असतात
तुझं असणं मात्र बाकी रहातं ...

Friday, June 19, 2015

मन आणि आभाळ

मनाचं आणि आभाळच
काहीतरी नातं असावं !
नाहीतर आभाळ भरून आल्यावर
मनही का दाटून यावं ?
-शरद

Wednesday, March 18, 2015

माझ्या वेड्या मनाला...

भेटीची ओढ नाही संवादाची जोड नाही
भावनेचे रीत नाही स्नेहाचे गीत नाही
फक्त जाणिव आहे तुझी आणि तुझ्या प्रेमाची
माझ्या वेड्या मनाला.
-अमृता भंडारी

Sunday, May 04, 2014

मनातल ओठांवर यायला वेळ लागतो

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग
तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून
दाखवायलाही !

Monday, April 07, 2014

मनाचा तळ

स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं त्याच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही...आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं...!!

Sunday, December 09, 2012