Thursday, August 21, 2008

Monday, August 11, 2008

Aayushyaach Sona....

हुर्रेssss..भारताला पहिलं गोल्ड मेडल!
१० मिटर रायफल रायफल शुटिंग स्पर्धेत भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्डमेडल पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकच्या तिस-या दिवशी पदकाचं खातं उघडलं आहे. दिल्लीच्या २६ वर्षीय बिद्राने फायनलमध्ये प्रवेश केला होता.

बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळामध्ये भारताच्या वाट्याला आलेलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.

१९८० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये मिळालेल्या गोल्ड मेडलनंतर भारताला मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.