Tuesday, March 24, 2015

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.

आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,
"मी आता रिटायर होतोय,
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
जे असेल ते मी खाईन,
जसा ठेवाल तसा राहीन."

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजच तुटावं, अगदी तसं झालं.

एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,
"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही."

खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण तो काकुळतीला का आला?

ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,

आई जवळची वाटत होती,
पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल,
पण दिसण्यात आलं नाही.

मला लहानाचा मोठा करणारा बाबा,
स्वःताच स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा,
का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं,
हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं.हे मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.

लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो,
तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.

आज माझंच मला कळून चुकलं.
— I love my dad

मिठी

मिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे

-चंद्रशेखर गोखले

Friday, March 20, 2015

गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

आंब्याचे तोरण आणि श्रीखंडाचा गोडवा, चैञाची चाहुल घेऊन आला गुढीपाडवा, गुढीचा मान,लीँबाचे पान, नव वर्ष जाव आपल्याला खुप-खुप छान.

गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा

तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा आणि नव वर्ष सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !


Wednesday, March 18, 2015

माझ्या वेड्या मनाला...

भेटीची ओढ नाही संवादाची जोड नाही
भावनेचे रीत नाही स्नेहाचे गीत नाही
फक्त जाणिव आहे तुझी आणि तुझ्या प्रेमाची
माझ्या वेड्या मनाला.
-अमृता भंडारी

Tuesday, March 17, 2015

त्या क्षणी ...

चुक मी केली त्या क्षणी ..
तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी..

प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..
पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त

मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..
तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती ...

रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या ...
मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या ....

बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..
तिच्या डोळ्यात पानी पाहून मन आनंदून जायचे..

झुगारून प्रेम तिचे, वैरी जालो मी तिच्या प्रेमाचा....
"नेहमी खुश रहा"..म्हणुन निरोप दिला तिने प्रेमाचा...

आज तिच्या आसवांची किंमत माला कलते आहे....
माझ्या आसवानी त्याची परतफेड मी करतो आहे.....

चुकलो, चुकलो मी म्हणुन मन माझे रडते आहे...
रोज तिला शोधण्यासाठी आकाश पाताल एक करतो आहे....

खूप अवघड असत...

खूप अवघड असत
त्या एका चेहऱ्याला विसरणं
त्याच्याजवळ असून सुद्धा
त्याच्यासाठी तरसण…
- सुधीर जगताप

Friday, March 13, 2015

माझी नेहमीची सवय...

माझी नेहमीची सवय
आरशात प्रतिबिंब पहायच
अन् पाहता पाहता
तुझ्या आठवणीत विरघळायच

वेळ...

वेळ...

प्रत्येकाच्या आयुष्यात...

प्रत्येकाच्या आयुष्यात...

Wednesday, March 11, 2015

ती...

ती

त्या दिवशी कॉलेज मध्ये
वेगळच काहीतरी घडलं
तिच्याशी झालेल्या eye-contact ने
गणितच माझं बिघाडलं

तिचा आवाज ऐकल्यावर
हृदयाचा ठोका वाढू लागला
ती समोर येताच
चेहरा माझा खुलू लागला

तिची स्तुति करायला
शब्दही मला कमी पडतात
ती दूर जाताना
मनाला माझ्या भोकं पडतात

दिवसाचे तास कसे संपायचे
तेच मला कळत नव्हतं
कॉलेजची वेळ संपल्यावर
मन बाहेर रमत नव्हतं

तिला बघण्यासाठी
सगळी लेक्चर्स attend केली
पण मी येतो म्हणुनच की काय
तिने सगळीच bunk केली

शनिवार,रविवार सुट्टी म्हणुन
photos तिचे बघायचे
आठवड्याचे सातही दिवस
तिचेच विचार करायचे

तिचं ते स्मितहास्य
मनात घर करून राहतं
आयुष्यातल वळण
तेजोमय करून जातं

college च्या शेवटच्या दिवशी
मन माझं बिथरुन जाईल
ती समोर येताच
'अलविदा' तेवढ म्हणुन जाईल...


Monday, March 09, 2015

मी गुलाब आणले होते

मी गुलाब आणले होते
काटे काटे ते काढून
नव्हते माहीत तेव्हा
काय ठेवलाय वाढून...!!

मी गुलाब आणले होते
तुला तुलाच द्यायला
तुझ्या नजरेचे बोल
सारे टिपून घ्यायला...!!

मी गुलाब आणले होते
लाल लाल मखमली
आत खोल काळजात
होती दसरा दिवाळी

मी गुलाब आणले होते
तू दिसता दिसना
इथे तिथेही पाहिले
कुठे कुठेच भेटेना...!!

दिस ढळत निघाला
चालले गुलाब कोमेजून
माझे मीच ते तेव्हा
गेलो होतो समजून

बसलो दूर पारावर
लागेना कशाचाच थांग
कापर शिरशिरी भरे
सुन्न झालं होत अंग

तुला दिलेच नाहीत
देऊ आता त्या नदीला
गेला हात बाजूला ते
गुलाब घ्यायला

नव्हते तिथे ते गुलाब
पण मखमल होती
नाजूक मनगटी तुझ्या
मोतीमाळ पण होती

पाहिले मी न तुला
न गुलाब ते दिले
पण दिसले ते मला
नेत्र दोन पाणावलेले ...!!
मी गुलाब आणले होते....!
Rohit Gadre.


प्रेम तुझ्यावर खूप केल

प्रेम तुझ्यावर खूप केल
पण तुला सांगू शकलो नाही
तू एकटी असताना सुद्धा
प्रेमाचा होकार मंगु शकलो नाही

Thursday, March 05, 2015

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या आयुष्यातील दुःख-पीड़ा यांचे
होळीमध्ये दहन होवून तुमच्या जीवनात
सप्तरंगाची उधळण होवू दे याच शुभेच्छा.
माझ्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणीना तसेच
त्यांच्या कुटुंबियाना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!