Friday, January 30, 2015

तुझ्या मिठीत...

तुझ्या मिठीत...

वाढदिवस!!

रोजच्या धकाधकीच्या जगण्यात येतो एक आड दिवस
आला आहे अगदी आज, जसा तुझा वाढदिवस
तुझ्या आकांक्षापुढे होऊ दे गगन ठेंगणे
तुझ्या संगतीत शिकतील सारे स्वप्न रंगणे
जगण्याचा एक दिलासा, तुझ्या हसण्यात
अन मग झोकुन द्यावे पुन्हा वाटते जगण्यात
पुरावावेत सारे लाड तुझे, आज तुझा लाड दिवस
मनमानी करून घेण्यासाठीच असतो ना वाढदिवस!!
काय भेट द्यावी तुला? प्रश्न असा पडला...
रम्य एक सायंकाळ, त्यावर चन्द्र जडला..
ता-यानी लगड़लेले डोईवर आकाश खुले
तुला देण्यासाठी माझ्याकडे हीच शब्द्फुले
जगण्याचे असू देत सारे, नकोत नुसते 'काढ'दिवस
माझ्या शुभेच्छा तुझ्यासाठी, सारेच व्हावेत वाढदिवस!!
-जय


Tuesday, January 27, 2015

तुझे येणे तुझे जाणे

तुझे येणे तुझे जाणे
असच ते वळून पहाणे
आवडते ग मला तुझे
चोरून छुपून मला बघून जाणे ....

Monday, January 26, 2015

Friday, January 23, 2015

तिने किती सुंदर दिसावं..

तिने किती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं...

तिने किती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं
सोबत तिच्या...

तिने किती साधं रहावं
त्यातही रूप तिचं खुलावं
कोणीही फिदा व्हाव
अदांवर तिच्या...

तिचं उदास होणं
कसं हृदयाला भिडावं
कोणालाही वाईट वाटावं
अश्रूंनी तिच्या...

तिचं हसणं
कोणालाही सुखवावं
कोणीही घसरून पडावं
गालावरल्या खळीत तिच्या...

तिच्या नजरेने मलाच शोधावं
अचानक नजरेने नजरेला भिडावं
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं
लाजेने चूर चूर व्हावं...

ती समोर असताना
मी सारं काही विसरावं
तिने इश्य करत लाजावं
मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं...

तिने फक्त माझंच रहावं
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं
साथ देऊ जन्मोजन्मी
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

प्रेम म्हणजे …

प्रेम म्हणजे …

Tuesday, January 20, 2015

थोडं अंतर राहुदे...

थोडं अंतर
राहुदे...
क्षणभर तुला
डोळे भरून पाहुदे...
-चंद्रशेखर गोखले

ठसकन मनात भरली ...

ठसकन मनात भरली ...

Saturday, January 17, 2015

नजरभेट

नुसतं दिसणं पुरेसं असतं
बोलायची गरज नसते ..
अशी नजरभेट मग कितीवेळ
मागल्यादारी मी आठवत बसते. .
- चंद्रशेखर गोखले

थंडीतलं ऊन

हे थंडीतलं ऊन कसलं
असून नसल्या सारखं
रुसलेलं माणूस कोणी...
गालातच हसल्या सारखं

~ चंद्रशेखर गोखले

Friday, January 16, 2015

एक कप वाफाळता चहा..अहाहा..

एक कप वाफाळता चहा..अहाहा..
एक कप चहा वाफाळता

थीजलेल्या मनास करी तरल
मनाभोवतीचे हिम विरघळेल
मन मोकळे बोलता येइल
मनातील सल बोच जाईल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

मेंदुवरील जळमटे हटतील
भोवतालचे कवच तुटेल
तेथे संवेदना पोचतील
आपल्यात संवाद साधेल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

जडावलेलि जीभ नरम होईल
शब्द एकेक बाहेर येतील
ह्रुदय जरा मोकळे होईल
कढ तेव्हढाच कमी होईल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

बाहेर कडक ऊन जरी असले
कडक ऊन्हाचे चटके जरी बसले
एक कप वाफाळता चहा घेशील
क्लान्त चेहरा टवटवीत दिसेल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

मन हे कसे ते शान्त होते
वादळ ते शमलेसे वाटते
वाफ़ जणु डोळ्यात जमते
म्हणुन मी निवलेला चहा घेते
एक कप चहा वाफाळता..

रजनी अरणकल्ले..

प्रेमगंध ....

प्रेमगंध ....

Wednesday, January 14, 2015

शुभ मकर संक्रांति

नेसशील जेव्हां तू डिज़ाइनर साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति

!! शुभ संक्रांत !!

समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप
हासत, नाचत, गात यावी दीप,
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे,
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे,
शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
!! शुभ संक्रांत !!

Tuesday, January 13, 2015

निशब्द एका तळ्या काठी....

निशब्द एका तळ्या काठी,
मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो.
पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये,
ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब, अन तिथे मी एकटाच होतो.
© कौस्तुभ


सुप्रभात मित्रांनो

सुप्रभात मित्रांनो