Friday, May 29, 2015

काच

काच
माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस
.
परिस्थितीच्या काचेवर
एकाबाजूने मी हात ठेवताच
दुसऱ्याबाजूने तू
बोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास
पाणीदार डोळ्यातून
किती बोलली होतीस
तेव्हाच एक धागा विणला गेलेला
त्या काचेच्याही आरपार
.
कीतीदातरी
प्रत्यक्ष आणि फोनवरही
निशब्दातच..
बोललीस माझ्याजवळ
तेव्हा
त्याच नात्यामुळे
त्याच धाग्यामुळे
सहज पोहोचलीस खोल मनात
तुला कळतच असेल, हो ना?
~ तुष्की (तुषार जोशी)

हे दिवस निघून जातील..

हे दिवस निघून जातील..

Tuesday, May 26, 2015

मौन

मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

– मुक्तायन, कुसुमाग्रज

Friday, May 22, 2015

एक सत्य घटना..सुधा मुर्तीं

एक सत्य घटना..
ही गोष्ट आहे १९७४ ची. तेव्हा बेंगलोर शहरात IISc. मधे
सुधा कुलकर्णी नावाची विद्यार्थीनी शिकत होती.
ती एकदा हॉस्टेलवरुन लेक्चर हॉल कडे जात असताना नोटीस बोर्ड
वर एक जाहीरात पाहीली. ती जाहीरात होती प्रसिद्ध
टेलको (आताची टाटा मोटर्स) . ती खालील प्रमाणे होती.
'The company required young, bright engineers, hardworking
and with an excellent academic background, etc. At
the bottom was a small line: ‘Lady Candidates need not
apply.’
त्या शेवटच्या ओळीने सुधाची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने
सरळ टेलकोच्या मुख्य प्रबंधकाला पत्र लिहून जाब विचारायचे
ठरविले. पण त्या वेळी त्यांचे नाव माहीत नसल्याने तिने सरळ
टाटा ग्रुप्सचे प्रमुख जे.आर. डी. टाटा यांना पत्र लिहले आणि ती ते
विसरुन गेली.
१० दिवसात तिच्या पत्राला उत्तर आले. तिला टेलको पुणे ईथे
ईंटरव्हूसाठी बोलावले होते त्यासाठी लागणारा सर्व खर्च
टेलको कंपनी करणार होती. ईंटरव्हूसाठी सहा पॅनलिस्ट होते. सुधाने
एंट्री केल्याबरोबर त्यांच्यात 'हीच ती जे.आर.डीं. ना पत्र
लिहणारी वगैरे कमेंट झाले. सुधा हुशार असल्याने तिला तो ईंटरव्हू
फारसा जड गेला नाही. ईंटरव्हू झाल्यावर
त्या सहाजणांपैकी एकजण म्हणाला. 'त्या जाहिरातीत तसे
लिहण्याचे कारण म्हणजे ही जॉब शॉप फ्लोर ची आहे.
मुली सहसा तिथे काम करत नाहीत मग एव्हढा ईंटरव्हू घेउन
फायदा होत नाही पण तुम्ही स्वतः ईंट्रेस्ट दाखविल्या बद्दल
धन्यवाद. तुम्ही शॉप फ्लोरवर काम करणा-या पहील्या महिला आहात.
काही दिवस असे गेले तोच एक दिवस जे.आर.डी. टेलको पुणे ला भेट
द्यायला आले. त्यावेळी टेलकोचे मुख्य प्रबंधक सुमंत मुळगावकर होते.
सुमंत मुळगावकरांनी सुधाची ओळख शॉप फ्लोरवरची पहिली महिला अभियंता अशी करुन दिली. त्यांनी सुधाचे हस्तांदोलन केले. आता मात्र सुधाला भिती वाटत होता न करो सुमंत सर किंवा जे.आर.डीं नी पत्राचा विषय
काढला तर पण तिच्या सुदैवाने दोघेही ती गोष्ट विसरले होते. सर्व
पाहणी करुन निघण्यास त्यांना रात्रीचे ९ वाजले. तेव्हा पार्कींग
लॉट मधे नव-याची वाट पाहत असलेली सुधा दिसली.
जे.आर.डींनी विचारल्यावर तिने कारण सांगितले. तेव्हा ते म्हणाले.
' रात्र खुप झालीय आणि अशा वेळी एका स्त्रीने असे एकटे उभारणे
ठिक नाही. मी तुमच्या सोबतीला उभारतो तुमचे मिस्टर येईपर्यंत. '
आता मात्र सुधाला मनात कालवा-कालव जाणवू लागली.
ईतका मोठा माणूस आपल्याबरोबर शुल्लक वाट बघत उभा आहे.
ईतक्यात सुधाचे मिस्टर आले. सुधाने त्यांची आणि जे.आर.डीं ची ओळख करुन दिली. 'हे माझे मिस्टर नारायण मुर्ती आणि हे.. ' पुढे सुधाजी काही बोलणार एव्हढ्यात नारायण मुर्तींचा चेहरा 'अजि म्या ब्रह्म पाहिले ' असा झाला होता. जे.आर.डी. हस्तांदोलन करताना मुर्तींना म्हणाले. 'मिस्टर मुर्ती कितीही मोठे झालात तरी आपल्या बायकोला अशी वाट बघायला लावू नका ' ईतके बोलून ते निघून गेले.
पुढे जेव्हा सुधा मुर्तींनी नोकरीचा राजिनामा दिला तेव्हा सुमंत सरांनी तो सरळ जे.आर.डीं कडे पाठविला. तेव्हा जे.आर.डी. स्वत: सुधा मुर्तींना फोन करुन राजिनाम्याचे कारण विचारले.
तेव्हा सुधाजी म्हणाल्या ' माझ्या मिस्टरांनी ईन्फोसिस नावाची स्वतंत्र कंपनी काढली आहे तेव्हा त्यांच्या मदतीसाठी मला जाणे भाग आहे.
तेव्हा जे.आर.डीं.नी प्रतिप्रश्न केला, 'तुम्ही यशस्वी झाल्यावर काय करणार?'
तेव्हा सुधाजी म्हणाल्या.' काही ठरविले नाही. आम्हाला तर हो ही माहीत नाही की आम्ही यशस्वी होऊ का नाही...' मधेच वाक्य तोडत जे.आर.डी गरजले 'शट अप ! असले रडगाणे गाऊ नका. नवीन सुरवात करताय तेव्हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. ऑल दी बेस्ट!
आणि हो अयशस्वी होऊन माझ्या कंपनीत तुम्ही परत दिसता कामा नये.'
त्यांनी रिसीव्हर खाडकन ठेवला.
पण ते शेवटचे शब्द सुधाताईंच्या मनात शेवटपर्यंत घुमत राहीले
धन्य ते जेआरडी आणि धंन्य त्या सुधाताई !
आपल्यात त्यांच्यातले एक टक्का गुण जरी आले तरी आपण यशस्वी उद्योजक होऊ !

Wednesday, May 20, 2015

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

– आरती प्रभू

एकांत माझा

एकांत माझा

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.

हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा.

तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.

अखेर भेटला नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.

दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

– सुरेश भट

Tuesday, May 19, 2015

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची, अनओळखीची जाणीव गूढ आहे त्यास

धूप कपूर उदाबात्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले एक तन एक मन
खास-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली

वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात काल पटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा!

-शांता शेळके

Monday, May 18, 2015

दुखः प्रेमातल्या विरहाचं

दुखः प्रेमातल्या विरहाचं
आज तिलाही कळाल होतं
म्हणूच मिठीत मला तिने
आज स्वतः मध्ये लपवला होतं
~ सुधीर जगताप

स्पर्श ...

तुझ्या जपलेल्या स्पर्शावर पुन्हा 
तुझे नवे स्पर्श विसावतात 
आणि संयमाची घट्टवीण 
ते माझ्या नकळत उसवतात 
~चंद्रशेखर गोखले


Wednesday, May 13, 2015

जगत्जेते पैलवान गामा यांची हृदय हेलावून सोडणारी यशोगाथा

मंडळी या हिंदुस्थानच्या मातीत जन्माला येणे हे परम भाग्याची गोष्ट आहे,एक एक असे नरवीर या भूमीत जन्माला आले त्यांची कीर्ती खरच आभाळा एवढी. अशाच एका नरवीराची कहाणी आज सांगत आहे ज्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मल्लविद्या जगाच्या काना कोपर्यात पोचवली.त्यांचे नाव गामा पैलवान.
अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेल्या गामांचा जन्म लाहोर (सध्या पाकिस्तान मध्ये ) मधल्या छोट्याश्या खेड्यात झाला.लहानपणापासून त्यांनी खूप कष्ट घेऊन कुस्ती हा खेळ जिवंत ठेवला. त्यावेळी हिंदुस्थानावर ब्रिटिशांचे राज्य होते.
त्या काळी संस्थानिक-राजे लोक कुस्त्यांची मोठी दंगल भरवत असत. अखंड हिंदुस्थानात गामना त्या काळी तोड नव्हती. सर्व पैलवानांना त्यांनी ५ मिनिटाच्या आसमान दाखवले होते.
त्यांची कुस्तीची हि भरारी आंतरराष्ट्रीय पातळीवर जावी म्हणून लाहोर चे राजे कुवरसिंग राजपूत यांनी त्यांना त्या काळी रशियात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जावे म्हणून विनंती केली, त्यांनी ती मान्य केली आणि १९२३ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गामा रशियाला रवाना झाले .
युरोपियन स्टाईलची कुस्ती यात खूपच अंतर आहे. पण गामा डगमगले नाहीत. त्यांनी मोठ्या जिद्दीनं कुस्तीची तयारी सुरू केली होती. युरोपियन कुस्तीशैलीचा त्यांनी अभ्यास केला, माहिती मिळवली.
तिथे गेल्यावर या नरविराला स्पर्धेत प्रवेश नाकारला कारण; तत्कालीन हिंदुस्थानावर इंग्रजांचे राज्य होते आणि इंग्रजांचा एक पैलवान स्पर्धेत आम्ही आधीच घेतला आहे असे कारण सांगून गामाना प्रवेश नाकारला .
गामा निमूट पणे तिथून बाहेर पडले. मात्र रशियाच्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशीच एक बातमी झळकली... ती अशी कि या स्पर्धेत जो पैलवान विश्वजेता होईल त्याने किंवा या भागातल्या कोणत्याही पैलवानाने गामा पैलवानांच्या बरोबर आखाड्यात ५ मिनिटे खेळून दाखवावे आणि २५ हजाराचे बक्षीस घेऊन जावे. हे आव्हान दिले होते खुद्द गामा पैलवानांनी ..............याला म्हणतात आत्मविश्वास आणि स्वतावरच विश्वास .
त्या ऑलिम्पिक मध्ये विश्वजेता पैलवान ठरला 'झिस्को’ नावाचा एक रशियन पैलवान. त्यामुळे साहजिकच त्यांना गमांचे ते आव्हान स्वीकारावे लागले.
कुस्ती ठरली. मा.हेन्री फोर्ड यांच्या नातवाने हि कुस्ती ठरवली .
सलामी झडली .. डोक्याला डोके लागले ...आंणी आणि आणि...केवळ दुसऱ्याच मिनिटात गामानी झीस्को ला अस्मान दाखवले .
सगळ्या रशिया नव्हे संपूर्ण जगात गामा पैलवानांची हवा झाली झीस्को ला हा पराभव खूप झोंबला ..३ महिन्यानंतर त्यांनी स्वताहून गामाना पुन्हा आव्हान दिले ....ती कुस्ती पण रशियात झाली . सलामी झडली...आणि केवळ १ मिनिटात धाक या डावावर झिस्को ला परत अस्मान दाखवले ..सलग दुसर्यांदा पराभव...........
यानंतर मात्र गामना हिंदुस्थानात परतावे लागले .....
गामा परत आले त्यावेळी खुद्द लाहोर चे राजे कुवरसिंग राजपूत यांनी त्यांच्या रथाला खांदा दिला ...पूर्ण जगावर गामा या पैलवानांचे अधिराज्य झाले होते. मात्र झीस्को ला सलग २ पराभव चैन पडून देत नव्हते ..त्यांनी ४ वर्षे कसून सराव केला आणि या पराभवाचा वचपा काढायचा असा निश्चय केला. ते हिंदुस्थानात आले आणि गामांच्या बरोबर पुन्हा ३ऱ्या वेळी कुस्ती ठरली. संपूर्ण जगातील संस्थानिक, राजे, उद्योगपती, हुकुमशहा यांच्या उपस्थितीत हि कुस्ती होणार होती. गामा तरीही नेहमी प्रमाणे शांत होते..हिमालयाच्या शिखराप्रमाणे ..
कुस्ती ठरली दिल्ली मुक्कामी. संपूर्ण देशाचं या लढतीकडे लक्ष लागलं होतं. स्टेडियम खचाखच भरलं होतं. हजारो प्रेक्षक श्‍वास रोखून कुस्ती पाहायला आपापल्या जागी बसले होते. कुस्ती सुरू झाली; आणि…. आणि रुस्तुम-ए-हिंद, हिंदकेसरी पैलवान गामांनी अवघ्या काही मिनिटातच झिस्कोला अस्मान दाखवलं!,.....सलग ३ वेळा पराभव झाल्यावर मात्र पुन्हा त्यांनी गामना कधी आव्हान दिले नाही .....असे होते जगत्जेता गामा पैलवान.
मात्र.......
परत भारत पाकिस्तान फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहिले. शेवटच्या काळात त्यांना २ वेळेच्या जेवणाचे हाल सुरु झाले. उदरनिर्वाहासाठी गामाना टेलरिंग व्यवसाय करावा लागला. एकेकाळी ज्यांच्या नावाने जगाला थरकाप सुटायचा अशा विराला लोकांचे कपडे शिवायची वेळ आली. ही खबर रशियात असणाऱ्या झीस्को च्या कानी गेली. झीस्कोचे वय त्यावेळी ५९ होते शिवाय ते रशियातले प्राख्यात वकील झाले होते .
त्यांना गामांची हि परिस्थिती झाली आहे हे ऐकून डोळ्यातून पाणी आले.. ते रशियाहून लाहोर मध्ये आले .गामा त्यावेळी झोपडी वजा घरात राहत होते त्यांना पाहुन झीस्कोनी गामाना मिठीच मारली..
दोघेही खूप रडले. झीस्कोनी त्या काळी म्हणजे १९४९ साली गामाना १ लाख रुपयांची मदत केली ..तसेच झीस्कोनी हिंदुस्थानच्या गव्हर्नरला पत्र पाठून ९० रु .ची पेन्शन चालू केली. तसेच अत्लास या पंप उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून झीस्कोनी २ लाख रुपयांची मदत गामाना मिळवून दिले. मंडळी अशी असते कुस्तीची नशा .कुस्तीच्या वेळी कुस्ती आणि दोस्तीच्या वेळी दोस्ती.
एका पैलवानाला दुसरा पैलवान भावासारखा असतो.
सलग तीनदा पराभव स्वीकारून सुध्द झीस्को गामाला विसरू शकले नाहीत.एका पैलवानाची कदर दुसरा पैलवानाच करू शकतो..दुसऱ्याचे ते काम नाही...
दो अक्षर की "मोत" और तीन अक्षर के "जीवन" में ढाई
अक्षर का "दोस्त" हमेशा बाजी मार जाता है.


स्त्री जन्मा तुझे ..

स्त्री जन्मा तुझे ..

Tuesday, May 12, 2015

तुलना...

काय गंमत पण आहे बोलण्यात आपण
"शब्द" किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या
"स्थाना"वरून निश्चित ठरवतो.


नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला
"खड्डा" म्हणून हिणवतो,
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला
"खळी" म्हणून खुलवतो.

भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला
"डाग" म्हणून डावलतो,
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला
"तीळ" म्हणून गोंजारतो.

तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला
"जटा" म्हणून हेटाळतो,
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला
"बटा" म्हणून सरकवतो.

असच असतं आयुष्यात आपलेही
"सोबती"नेच आपण तसे घडतो,
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो
"योग्य" सोबतीनेच अधिक बहरतो.

माणूसघाण्या

माणूसघाण्या 

Sunday, May 10, 2015

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रसिध्द उद्योगपती बी जी शिर्के यांच्या आयुष्यातीली प्रसंग
‪#‎मातृदिन‬ ‪#‎आई‬ ‪#‎mothersday‬ ‪#‎happymothersday‬

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते. उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली. संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले. तितक्यात मुलगा शाळेतून आला आईला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.

मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले. मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो. माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ
करून आला आई जवळ बसला आणि आईला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय.

आई ने आजूबाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते. पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर. माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या, हाताची लाही लाही झाली. पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय. त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले. त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली.

आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले, मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले ? मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या, मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस काही खाल्लेस कि नाही. त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून पक्कड काढून आईच्या हातात दिली. आईच्या डोळ्यात त्या पक्कडीच्या स्पर्शाने अश्रू आले आई धन्य झाली.....

आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली ."

"दोस्तानो ,आईच्या पायाशी स्वर्ग आहे ..कधी हि तिला दु:खवू नका ....
डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई
पुन्हा दिसत नाही "

"फक्त Like किंवा Share नका करू, आपल्या आई साठी काही तरी करा .....!
आई माझा गुरु ..
आई कलपतरु . .
आई सैख्याचे सागरु..
आई माझी ..
Mother's Day, Aai