Monday, March 31, 2014

मराठी संस्कृती ... मराठी अस्मिता ...


मराठी संस्कृती ... मराठी अस्मिता ...

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नवं वर्षाच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maduryacha Gudi Padwa...

Maduryacha Gudi Padwa... माधुर्याचा गुढी पाडवा ...

Sunday, March 30, 2014

निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच गुढी...

निळ्या निळ्या आभाळी,
शोभे उंच गुढी,
नवे नवे वर्ष आले,
घेऊनी गुळसाखरेची गोडी...
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. नुतनवर्षाभिनंदन...

गुढीपाडवा : नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस ... !

छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस ... !
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला छत्रपति संभाजी महाराजांचा वधु - तूळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला.
१ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. बहादुर गड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्या दिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. अखेर शेवटी ११ मार्च १६८९ ला धर्मं आणि राज्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.

Sunday, March 23, 2014

शहीद दिवस

शहीद दिवस

23 मार्च 1931 की मध्यरात्रि को अंग्रेजी हुकूमत ने भारत के तीन सपूतों भगत सिंह, सुखदेव और राजगुरु को फांसी पर लटका दिया था. अदालती आदेश के मुताबिक भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को 24 मार्च 1931 को फांसी लगाई जानी थी, सुबह करीब 8 बजे. लेकिन 23 मार्च 1931 को ही इन तीनों को देर शाम करीब सात बजे फांसी लगा दी गई और शव रिश्तेदारों को न देकर रातों रात ले जाकर व्यास नदी के किनारे जला दिए गए. अंग्रेजों ने भगतसिंह और अन्य क्रांतिकारियों की बढ़ती लोकप्रियता और 24 मार्च को होने वाले विद्रोह की वजह से 23 मार्च को ही भगतसिंह और अन्य को फांसी दे दी.

दरअसल यह पूरी घटना भारतीय क्रांतिकारियों की अंग्रेजी हुकूमत को हिला देने वाली घटना की वजह से हुई. 8 अप्रैल 1929 के दिन चंद्रशेखर आज़ाद के नेतृत्व में ‘पब्लिक सेफ्टी’ और ‘ट्रेड डिस्प्यूट बिल’ के विरोध में ‘सेंट्रल असेंबली’ में बम फेंका. जैसे ही बिल संबंधी घोषणा की गई तभी भगत सिंह ने बम फेंका. इसके पश्चात क्रांतिकारियों को गिरफ्तार करने का दौर चला. भगत सिंह और बटुकेश्र्वर दत्त को आजीवन कारावास मिला.

भगत सिंह और उनके साथियों पर ‘लाहौर षडयंत्र’ का मुकदमा भी जेल में रहते ही चला. भागे हुए क्रांतिकारियों में प्रमुख राजगुरु पूना से गिरफ़्तार करके लाए गए. अंत में अदालत ने वही फैसला दिया, जिसकी पहले से ही उम्मीद थी. भगत सिंह, सुखदेव, राजगुरु को मृत्युदंड की सज़ा मिली.

23 मार्च 1931 की रात पराधीन भारत के तीन नायकों ने हंसी हंसी मौत की सूली को गले से लगा लिया. आज भगतसिंह, राजगुरु और सुखदेव तो हमारे बीच नहीं हैं लेकिन उनकी आवाज और सोच आज भी हमारे अंदर है. उनका मानना था कि सत्ता की नींद में सोई सरकार को जगाने के लिए एक धमाके की जरुरत होती है. ऐसे ही आज भी लगता है कि भ्रष्टाचार से लिप्त इस सरकार को जगाने के लिए एक धमाके की जरुरत है ताकि सत्ता का मजाक बनाने वाली यह सरकार अपनी नींद से जाग सके.

Maitri ... मैत्री ...

Maitri ... मैत्री ...

Wednesday, March 19, 2014

शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ...
दीन-दलितांचा कैवारी जन्माला...
दृष्टांचा संहारी जन्मला...
अरे माझा राजा जन्मला..."

शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...


सर्व शिवभक्तांना "शिवजयंतीच्या" हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..

Sunday, March 16, 2014

Rang....

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी..
रंगांमध्ये रंगुन जाण्याआधी..
तुम्हाला मराठी कविता  ब्लॉग कडुन "होळीच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

होळीमागचा शास्त्रार्थ

होळीमागचा शास्त्रार्थ

आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसर्‍याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्‍या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्‍याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्‍या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.

खल भावानंची आम्ही करणार होळी

खल भावानंची आम्ही करणार होळी,
अशी आगळीच आता जा ळणार होळी
दाही दिशांत चेतवू वणवा असा की,
या विश्वात ना ती सामावणार होळी
अबलांचे व्हावे असे सबलीकरण,
मग कोण करण्या थजावणार होळी
आमच्या जीवांशी ज्यांनी केळला
शिमगा
आज आम्ही त्यांची पेटविणार होळी
ज्ञानगंगेच्या रंगात न्हाऊ जर का सारे
अंधविचारांची कशी नाही होणार होळी
द्वेषाग्नीला हवी फुंकर प्रेमाची
द्वेषाने का? द्वेषाची विझणार होळी
घरोघरी जेव्हा विखुरतील सप्तरंग
तेव्हाच खरी देशांत रंगणार होळी.
अनिल कोशे

Saturday, March 08, 2014