Tuesday, June 26, 2007

प्रेम हे होत नसत

प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुिणच नसत
आपलस कराव लागत


एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नािहच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला िशकायच असत

म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस किुणच नसत
आपलस कराव लागत

राशिभविष्यः २४ ते ३० जून २००७

राशिभविष्यः २४ ते ३० जून २००७

मेष

आरोग्य चांगले राहील! आरोग्य चांगले राहील!

रवी-शुक्र हे नवीन वास्तू संबंधीच्या विचारांना वेग देतील. आरोग्य चांगले राहील. वेगाने नियोजित कामे पूर्ण होतील. प्रवासाचा आनंद लुटाल. पाऊस चांगला पडल्याने शेतकरी खूष होतील. समाजात प्रतिष्ठा मिळेल. घरात वादांवर नियंत्रण हवे!

वृषभ

मोठ्या लोकांशी मैत्री!

रवी-मंगळ-केतू यांच्या खेरिज बाकीचे सर्व ग्रह अनुकूल आहेत. त्यामुळे आथिर्क स्थिती चांगली राहील. दागिन्यांची खरेदी होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. कलेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळेल. मोठ्या लोकांशी मैत्री होईल. मात्र सट्टा-लॉटरीतून नुकसान संभवते.

मिथुन

चिडचिडेपणा येईल!

गुरु-शनि व आपल्याच मिथुन राशीत असणारे रवी-बुध विरोधात आहेत. त्यामुळे मनाने अस्वस्थ रहाल. धंद्यातही मन रमणार नाही. चिडचिडेपणा येईल. त्यावर नियंत्रण ठेवा. थकवा जाणवेल. आथिर्क स्थिती ठीक राहील. प्रवास घडेल व गृहसौख्यही लाभेल.

कर्क

लेखक-प्रकाशक खूष

मंगळ-गुरु व तुमच्याच कर्क राशीत असणारा शुक्र अनुकूल आहेत. त्यामुळे बेकारांना कामधंदा मिळेल. धाडसाने जी कामे कराल त्यात यश मिळेल. लेखक-प्रकाशक खूश राहतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. मालकाशी-वरिष्ठांशी वाद निर्माण होईल. वाद वाढवू नका.

सिंह

मित्रांचे सहकार्य मिळेल!

मंगळ- गुरु- शनिवार विवाह स्थानातील राहू-हर्षल हे अनुकूल नाहीत. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. कोर्ट-कचेरीच्या फंदात पडू नका. नोकरीच्या ठिकाणी सावध रहा. रवी-बुध- शुक्र हे मात्र लाभ घडविणार आहेत. मित्रांचे सहकार्य मिळेल. त्याचा लाभ घ्या.

कन्या

मौल्यवान वस्तूंची खरेदी!

ग्रहस्थिती चांगली आहे; त्यामुळे उत्तमपैकी कौटुंबिक सुख लाभेल. कीतीर् लाभेल. आथिर्क स्थिती ठीक रहाणार असल्याने आवडत्या मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. आथिर्क गुंतवणूक करता येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. अंगावरच्या जखमांची काळजी घ्या.

तूळ

कुटुंबियांचे सहकार्य मिळेल!

रवी-मंगळ- बुध-शुक्र- शनि हे विरोधात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दव्याचा नाश होऊ शकेल. अनेक प्रकारच्या संकटांशी सामना करावा लागेल. स्थलांतराचीही शक्यता आहे. दव्य चिंता दूर होईल. कुटुंबियांकडून चांगले सहकार्य मिळणार आहे.

वृश्चिक

आथिर्क स्थिती चांगली

मंगळ हा विरोधकांना गप्प बसवणारा आहे. शुक्र नवीन कपड्यांचा योग आणणार आहे. बुध आवडत्या कलेतून आनंद देणार आहे. नेपच्यून संशोधन कार्यात यश देणार आहे. हे सर्व ग्रह आथिर्क स्थिती चांगली ठेवणार आहेत व गृहसौख्यही देणार आहेत. मात्र तब्येत सांभाळा.

धनु

नवीन कपड्यांचा योग!

ग्रहस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे सर्व व्यवहार सावधपणे करावेत, कोणाबद्दल गैर समजूत करून घेऊ नये. अन्यथा वाद निर्माण होतील. शरीराला कष्ट होतील अशी कामे करू नयेत. आथिर्क स्थिती ठीक राहील. कौटुंबिक सुख मिळेल. नवीन कपड्यांचा योग आहे.

मकर

स्पधेर्त यश मिळेल

वरिष्ठांची मजीर् सांभाळण्यासाठी रवीचे सहकार्य मिळेल. स्पधेर्त यश मिळवण्यासाठी व समाजात श्ोष्ठत्व सिद्ध करण्यासाठी गुरुचे सहकार्य मिळणार आहे. मित्रांकडूनही सहकार्य मिळेल. सर्व चिंता दूर होणार आहेत. त्यासाठीचा उपाय म्हणजे नामस्मरण करणे!

कुंभ

ईश्वर चिंतनात मन रमवा!

अनुकूल असणारे मंगळ-शनि व्यवसायातून यश व धन देणार आहेत. मौल्यवान वस्तूंचा लाभ होणार आहे. विरोधातील ग्रह उगाचच चिंता निर्माण करणार आहेत, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. वेळीच उपचार करा. वैर निर्माण करू नका. ईश्वर चिंतनात मन रमवा!

Saturday, June 02, 2007

पहिला पाऊस पडतो तेंव्हा.....

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

पुन्हा एकदा पावसात....

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात.
तिची माझी झाली भेट..
त्या ओल्याचिंब दिवसात.....

समोर मी दिवसताच
मना पासुन हसली ती...
उशीर का झाला??? म्हणत,
थोडीफार रुसली ती....

देताच नजर नजरेला..
थोडीशी... ती वरमली.
जवळ ओढून घेताच
थोडीशी....ती शरमली.

बाहेर पावसाची रिपरिप
झोंबणारा वारा
चिंब मनं...चिंब तन...
आसमंत सारा।

अगदी नेमक्या क्षणी,
वीज सुद्धा कडाडली.
मिठी अधिक घट्ट होऊन
ओठापाशी स्थिरावली.

तिच्या ओठांशी.......
माझ्या ओठांचे.......
बंध अचानक जुळुन आले
कुणी तरी रसिकतेने...
त्यालाच चुंबन म्हणाले.

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात..
तिची माझी व्हावी भेट
एका ओल्याचिंब दिवसात

गारवा असाही.....

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.
बघ माझी आठवण येते का..????

यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस.
या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर.
या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये.
घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी.... मेल करताना...
बघ माझी आठवण येते का???

पहिल्या पव्सच्या हर्दीक शुभेचा



पहिल्या पाव्सच्या हर्दीक शुभेचा ...!!!!!!!!!!!!!