Wednesday, October 26, 2011

Deepavali Subheccha...दीपावली शुभेच्छा

Deepavali Subheccha...दीपावली शुभेच्छा
कारगीलच्या युद्धात शहिद झालेल्यांच्या घरीही
आज दीपावली साजरी होत असेल.
आणि का नाही ... त्यांचा हक्क सर्वात प्रथम आहे.
पण कंदिलाच्या जागी त्यांच्या दारात शौर्यपदक,
तर पणत्यांच्या जागी मुलाची शौर्यगाथा असेल ,
हाच काय तो एक त्यांच्या आणि आपल्या घरातला फरक.

नसेल आज सोबत त्यांचा मुलगा ...जो दरवर्षी
मोठया आनंदाने त्यांच्याबरोबर दीपावली साजरी करायचा.
पण म्हणून काय झाले !
त्याच्या लहानसहान आठवणीच पुरेशा आहेत ,
वृद्ध आईवडिलांच्या कोमेजलेल्या ओठांवर हसू आणायला .

त्यांना अभिमान असेल की आज संपूर्ण हिंदुस्थानात
जी मोठया आनंदाने ही दीपावली साजरी होत आहे .
याला एकचं गोष्ट कारणीभूत आहे . आणि ती म्हणजे
त्यांच्या शूरवीर मुलाने , आपल्या देशाच्या रक्षणांसाठी ,
शांतीसाठी हसतमुखाने दिलेली आपल्या प्राणांची आहुती !
हिच गोष्ट पुरेशी आहे त्यांच्या कुटुंबियांस
हि दीपावली साजरी करण्यास .
ठाऊक आहे मला
लिहीणं आणि बोलणं खूप सोपं असतं.
ज्याचं जळत ... त्यालाच त्याच दु:ख कळत .

म्हणूनचं ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते ,
आणि जे आजही सीमेवर निधडया छातीने
देशाचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र तेनात आहेत ते .
जांच्या विश्वासावरच आपण हि दीपावली
आज निर्धास्तपणे साजरी करू शकतो .
अश्या त्या सर्व वीर जवानांना , आणि त्यांच्या कुटुबियांना
हि दीपावली सुखा समाधनाची जावो हीच सदिच्छा !
तुम्हां सर्वाना दिपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा !

Deepavali Abhishtachintan...दीपावली अभिष्टचिंतन...

Deepavali Abhishtachintan...दीपावली अभिष्टचिंतन...