Tuesday, December 24, 2013

Rusva.... रुसवा ...

मी बोलायची वाट बघत
तू ही गप्प
घडाळ्याची टीक टीक सुरू,पण
काळाचा ओघ?..जागीच ठप्प

Thursday, December 19, 2013

Tujhe Soundarya... तुझे सौंदर्य ...

तुझ्या निखळ सौंदर्याकडे
बघून सुंदरताही लाजलीयं.
तुझे हास्य ऐकून,
खुद्द हास्यही हिरमुसलयं.

त्या खळखळणा-या निरझराने,
तुझीचं प्रेरणा घेतलीयं.
वेणूंच्या सप्तसुरांनीही,
तुलाचं साद घातलीयं.

तुला बघितल्यापासून,
माझे शब्दचं हरवलेत.
पण माझ्या ह्रदयाचे गीत,
माझे ओठ गुणगुणतं आहेत.

तुझ्या प्रेमाने माझ्यावर,
एक वेगळीचं जादू केलीयं.
देवाकडे काय मागू तूला,
तो स्वतःचं माझ्याकडे तुला मागायला आलायं.

Khari Maitri... खरी मैत्री...

एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर
खेळत
होता....
त्याच्या तीरप्या चालीने वाळूवर
काही रेखाटत
होता..
समुद्राच्या लाटा किनार्याला धडकत होत्या
आणि त्याने मागे सोडलेले त्याचे पदचिन्ह
पुसत
होत्या...
त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले
आपण तर मित्र आहोत मग सांग बरे तु असे
का केले ?
मी मेहनतीने इतकी सुंदर नकाशी केली
तु मात्र क्षणात येवून ती पुसली....
हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली
मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली
तु मेहनतीने सुंदर नकाशी काढली...
मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली
कारण या किनार्यावर एक कोळी फिरत आहे
काही सावज मिळते का हे शोधत आहे..
जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते
तर त्याने तुला सहज शोधले असते...
खरचं माला तुला दुखवायचे नव्हते रे
मला तुला कायमचे गमवायचे हि नव्हते..
हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली
क्षणाचाही वेळ न दडवता त्याने
लाटेची माफी मागीतली
यालाचं कदाचित खरी मैत्री म्हणातात...
सारे जिवलग मित्र एकमेकांवर असेचं प्रेम
करतात ....
बरोबर ना ??????

Monday, December 16, 2013

!!....दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!!!

!!....दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!!

अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।

श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

Tuesday, November 26, 2013

२६-११- भावपुर्ण श्रद्धांजली ...


सौभाग्यावतीचा कुंकू जेथे
रात्रीअपरात्रीही पुसला जातो
आमच्याच घरात आम्ही आता
पोरके झाल्याचा भास होतो !

मुंबईवरील हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली ...
जय हिंद!
 जय महाराष्ट्र !

Saturday, November 16, 2013

Sachin tula Salaam

स सहज सुंदर खेळामधली तुझी
नजाकत आता आम्हाला दिसणार नाही

चि चित्तवेधक चौकार षटकारांची आतषबाजी आता पहाता येणार नाही

न नव्या दमाच्या खेळाडूंना तुझा मैदानावरचा सहवास आता मिळणार नाही

पण, हे.....

तेंडुलकर कुल शिरोमणी तुझी क्रिकेटची 25 वर्षांची कारकीर्द आमच्या सारख्या तुझ्या चाहत्यांच्या हृदयाचा मानबिंदू सदैव असेल.

तुझ्या क्रिकेट कारकिर्दीला माझा सलाम.....

आता आज्ञा असावी ...

आता आज्ञा असावी ...

Friday, November 15, 2013

THANK YOU SACHIN !!!!

तेरा पीच पर उतरना, तेरा डेंजरस बॉल्स पर ब्रिलियेंट शॉट्स खेलना,
तेरा Fantastic फुटवर्क का use करना, नहीं भूलूंगा मैं,
जब तक है जान,
जब तक है जान....
अपोनेंट्स को प्रेशर में लाना, तेरी जेंटेल्मेनशिप दिखाना,
तेरा सेंचुरीस पर हेल्मेट और बॅट उठना, मोहब्बत करूंगा मैं,
जब तक है जान,
जब तक है जान...


CRICKET IS A RELIGION, SACHIN IS MY GOD...


THANK YOU SACHIN !!!! 

Thursday, November 14, 2013

सचिन 200


हिंदुस्तान चे नाव संपूर्ण विश्वात ज्यांनी गेली २४ वर्ष रोशन केलं तो संपूर्ण देशातील युवकांच्या गळ्यातला ताईत सचिन तेंडुलकर आज त्याच्या आयुष्यातला शेवटचा क्रिकेट सामना खेळत आहे. ह्या ऐतिहासिक सामन्यासाठी त्याला कोटी-कोटी 'मनपुर्वक शुभेच्छा' !!!!!!!

Baaldinachya Hardik Shubhechha...बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Baaldinachya Hardik Shubhechha...बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुळशी विवाह माहिती आणि कथा

तुळशी विवाह माहिती आणि कथा

विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव.कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणुन अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळशीस घरातीलच कन्या मानुन,घरातील तुळशी वृंदावन वा कुंडिची गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात.त्यावर बोर चिंच आवळा,कृष्णदेव सावळा असे लिहितात.बोर,चिंच,आवळा,सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात.त्यात देव्हार्‍यातील बाळकृष्णाची मुर्ती ठेवतात.तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात.त्यावर मांडव म्हणुन उस वा धांड्याची खोपटी ठेवतात. त्यानंतर,दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणुन त्यांचा विवाह लावला जातो.घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतु आहे.

तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यत: व्दादशीला करतात.



कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर विज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला व्दादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुध्द नवमीला विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एक गंध्यानं तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने त्याने स्त्री वेष घेऊन त्या माळिणी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळिण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधा किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हा ही किशोरीवर मोहित झाला. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा विज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्या सारख्या देवाला तिचं वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न् पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडीलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजला हा विवाह मान्य करणं भाग पडलं. कार्तिक व्दादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप दु:खी झाला, व त्याने ठरवलं की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर विज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळलं.


असा करावा तुळशी विवाह!

tulsi vivah

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो.

तुळशी व‍िवाह कसा करावा?
* तुळशी व‍िवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी.
* मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
* चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
* यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
* यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
tulsi vivah

* गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
* मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
* यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
* नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
* नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
* शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.


 

Tuesday, November 12, 2013

महाराष्ट्राची अनाथांची माय

समुद्राला हि देईल माया अशी महाराष्ट्राची अनाथांची माय

Tuesday, November 05, 2013

भाऊबीज

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे.’ आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण.

बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

Monday, November 04, 2013

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
आई, रात्र अधिकच झालीय,
दिव्यातल तेल संपत आलय,
बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे दिव्यांचा झगमगाट,
कोठे फराळाचा सुवास,
आपल्या घरात तर ऐक दाना ही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नव्या कपड्याच्या घड्या,
बाहेर उचं उचं माड्या,
आपल्या झोपडीला अजून दारही नाही
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?
कोठे नोटांची पुजा,
तर कोठे सोन्याचे हार,
तुझ्या गळ्यात सोन्याचा ऐक मणी नाही,
सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

कवी- सुभाष सोनकांबळे,(बेरकी)

दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा

दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा 

Saturday, November 02, 2013

दिवाळी आली की...

दिवाळी आली की, वाटतं राजा तू आहेस,
तू अजुनही जीवंत आहेस . . .
प्रत्येक अंगणात तुझे गडकिल्ले उभे राहतात
त्याला खिंडारे नसतात,
ना भग्न अवस्थेतले तुझे राजवाडे असतात,
असतं ते फक्त चैतन्य ... नव्या उमेदिनं
सळसळणारं ...
मशाली, चिरागदाने, शामदाने नसतातं,
पण असतात पणत्या तुझ्या मांगल्याचं स्वरुप
सांगणार्या,
गड बांधताना एक-एक
चिमुकला अभियंता आपापली विचारशक्ती ला चिखलाने
माखलेले हात, बरबटलेले कपडे,
पण तोंडावर तेज विलसत असतं,
एक भावना मनात ज्वलंत असते,
की "हो राजा तुला बसायला,
तुझा रुबाब अन् थाट दिसायला,
तुला विराजमान व्हायला एकच एक
जागा ह्या भूतलावर आहे, ते म्हणजे
गडकोट,
आणि ती मी जागा निर्मीली आहे,
माझ्या अंगणातल्या गडावर माझ्या राजाचं
वास्तव्य
असेल, माझ्या गडाचा मीच हिरोजी इंदुलकर!!!
याहून माझ्यासाठी आनंदाची दुसरी गोष्ट
नाही !!"
आणि हे सारं पाहताना तुझे डोळे आकाशात
पाणावले
नसतील तर नवल! आणि एक वाक्य
त्या गडकर्याच्या मनात
नेहमी गुंजत राहिल,
"उभाच राहिन मी सांगेन
गाथा तुझ्या पराक्रमाची,
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या ईतिहासाची" !! जय भवानी !!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभूराजे !! शिवभक्त

Friday, November 01, 2013

धनत्रयोदशी दंतकथा



धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते.

धनत्रयोदशी दंतकथा

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाउन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.

तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
-------------------

Thursday, October 31, 2013

आज वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)

आज वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.....

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!
१. वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
.
.२. धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
..
३. नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
. .
४. लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !
.
.५. पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
..
६. भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !