Saturday, June 02, 2007

पुन्हा एकदा पावसात....

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात.
तिची माझी झाली भेट..
त्या ओल्याचिंब दिवसात.....

समोर मी दिवसताच
मना पासुन हसली ती...
उशीर का झाला??? म्हणत,
थोडीफार रुसली ती....

देताच नजर नजरेला..
थोडीशी... ती वरमली.
जवळ ओढून घेताच
थोडीशी....ती शरमली.

बाहेर पावसाची रिपरिप
झोंबणारा वारा
चिंब मनं...चिंब तन...
आसमंत सारा।

अगदी नेमक्या क्षणी,
वीज सुद्धा कडाडली.
मिठी अधिक घट्ट होऊन
ओठापाशी स्थिरावली.

तिच्या ओठांशी.......
माझ्या ओठांचे.......
बंध अचानक जुळुन आले
कुणी तरी रसिकतेने...
त्यालाच चुंबन म्हणाले.

पुन्हा एकदा पावसात
पुन्हा एकदा पावसात..
तिची माझी व्हावी भेट
एका ओल्याचिंब दिवसात

No comments:

Post a Comment