Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thodkyat
Majhya aani Majhya kahi aavadtya Marathi Kavita, Lekh, Marathi Charolya, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Kathakathan anne khahi Hindi Kavita...
Thursday, January 13, 2011
Wednesday, January 12, 2011
Tuesday, January 11, 2011
Monday, January 10, 2011
Prem Tujha Khara Asel Tar.... प्रेम तुझं खरं असेल तर....
Prem Tujha Khara Asel Tar....
प्रेम तुझं खरं असेल तर....
ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना……. प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..
विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..
आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..
आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..
पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..
शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.
Thursday, January 06, 2011
Wednesday, January 05, 2011
Tuesday, January 04, 2011
Monday, December 20, 2010
Wah Sachin !!!!!!!!!
विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण करून आणखी एका विक्रमाला गवणसणी घातली. आपल्या Master Blaster ला Marathi Kavita Blog कडून हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!
Subscribe to:
Posts (Atom)










