Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thodkyat
Majhya aani Majhya kahi aavadtya Marathi Kavita, Lekh, Marathi Charolya, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Kathakathan anne khahi Hindi Kavita...
Thursday, October 29, 2015
Wednesday, October 28, 2015
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या गालावरच्या खळीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या काळ्या कुंतल केसांनी
मज वेड कसे लाविले
तुझ्या भुरभुरणार्या बटांनी
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने
मज वेड कसे लाविले
वार्यासंगे फडफडणार्या पदराने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या ठुमकत मुरडत चालीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या थिरकत्या पैंजणानी
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या घायाळ करत्या नजरेने
मज वेड कसे लाविले
तुझ्या धुंद अशा मिठीने
तुझे प्रेम मजला सांगितले
सौ मनिषा पटवर्धन
मज वेड कसे लाविले
तुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या काळ्या कुंतल केसांनी
मज वेड कसे लाविले
तुझ्या भुरभुरणार्या बटांनी
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने
मज वेड कसे लाविले
वार्यासंगे फडफडणार्या पदराने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या ठुमकत मुरडत चालीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या थिरकत्या पैंजणानी
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या घायाळ करत्या नजरेने
मज वेड कसे लाविले
तुझ्या धुंद अशा मिठीने
तुझे प्रेम मजला सांगितले
सौ मनिषा पटवर्धन
Monday, October 26, 2015
अशी सावळी आहेस
अशी सावळी आहेस
हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस
सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस
गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस
स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस
तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस
~ तुष्की नागपुरी
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०
हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस
सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस
गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस
स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस
तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस
~ तुष्की नागपुरी
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०
Thursday, October 22, 2015
Tuesday, October 20, 2015
Monday, October 19, 2015
साडीचा "पदर" !
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन् कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन् संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन् नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन् कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन् संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन् नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे
Friday, October 16, 2015
नवरे...
(महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)
ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो.
आदर्श नवरा दाखवा ,
हजार रुपये मिळवा
खरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...
तीर्थ करूं जाता म्हणती कावळा, न करिता त्याला म्हणती बावळा
फार खाय त्याला म्हणती अघोरी, राक्षस हा असे खादाड भारी
थोडे खाय त्याची करिती टवाळी, अन्न कैसे पाप्याच्या कपाळी
तुका म्हणे किती राखावी मर्जी, संसाराचे त्रास घेता.
बायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात , ' अर्थहीनधांगडधिंगा. ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वीनिर्माता. ' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचासूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही ,त्याला टीकाकार म्हणतात.
नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय. '' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास! सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून ?''
हनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घोगरा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला , 'स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं! ''
ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.
एकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीचमेषपात्र आहे. ''
आणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''
एक नवरा तर जेवायला बसला की , पोळी हातात पकडून विमनस्कपणे सूक्ष्मात बघत गायचा , '' आई तुझी आठवण येते ''. शेवटी ती बाई एके दिवशी वैतागून म्हणाली , ''आईच्या हातच्या पोळ्या एवढ्या प्रिय असतील ना , तर जा आईकडेच हा कटोरा घेऊन. ''
हळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला! खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''
माझ्या पतीपीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.
नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या , '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. ' आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर ,पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. ' प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते ,तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे ?''
तशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा.''
आळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.
सारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे ,घोरनारे, सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.
एक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''
नवऱ्यांचा , बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी , साडी नवी वाटतं?'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई अंगभर पदर घेऊ लागली.
सारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात , पावडर लावतात , वळून-वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते.
स्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.
बायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे , ' मीपण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवषेर् पोस्टात नोकरी करीत राहाणे, अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.
कुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''
गुळगुळीत दाढी केलेल्या , गोल बायकी चेहऱ्याचे , काळ्याभोर डोळ्यांचे , हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात, पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.
नवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात ,तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो ?'' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का ?'' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का ?'' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा ?'' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...
... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीत आहे.
- शरद उपाध्ये
Wednesday, October 14, 2015
नवरात्र.... रंग
नवरात्र....
एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.
दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.
चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.
पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.
सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.
सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.
आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.
नववा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.
जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!
एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.
दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.
चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.
पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.
सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.
सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.
आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.
नववा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.
जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!
Tuesday, October 13, 2015
Monday, October 12, 2015
Friday, October 09, 2015
Monday, October 05, 2015
एक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)
एक तारा लुकलुकणारा.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)
एक तारा लुकलुकणारा
आणि वारा दरवळणारा
खिडकीत जरा येऊन बघ
तारा माझा भास देईल
वारा तुझा श्वास होईल
स्वत:मध्ये हरवून बघ
मन मनात गाणं गाईल
चेहऱ्यावरती हसू येईल
हसता हसता लाजून बघ
वारा खिडकीशी रेंगाळेल
तारा तुझ्यावरती भाळेल
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' म्हणून बघ....!!
....रसप....
आजीबाईचा बटवा
खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||
छोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||
छोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||
Subscribe to:
Posts (Atom)