Monday, March 24, 2008

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti


कविराज भूषण यांच्या शीवाजी महाराजन वरील कवीता....
सरवानी जरुर आइका
जय भवानी जय शीवाजी !!!!!!


Powered by eSnips.com

++ सेर सिवराज है ++

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||

पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |

ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||

दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |

भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||


-कविराज भूषण

{जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात}
___________________________


निश्चयाचा महामेरु | बहुत जनंसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||
नरपती हयपती गजपती | गडपती भूपती जळपती |
पुरंदाराणी शक्ति | पृष्ठाभागी ||

यशवंत किर्तिवंत | सामर्थ्यावंत वरदवंत |

पुण्यवंत नितीवंत | जाणता राजा ||

आचारशील विचारशील | दानशील धर्मशील |

सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठाई ||

धीर उदार गंभीर | शुर क्रियेसी तत्पर |

सावधपणे न्रुपवर | तुच्छ केले ||

देवधर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण |

ह्रुदयस्थ झाला | नारायण प्रेरणा केली ||

या भुमंडळाचे ठाई | धर्मरक्षी ऐसा नाही ||

महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||

कित्येका दुष्ट | संहारिला कित्येकासी धाक सुटला |

कित्येकास आश्रय जहाला| शिवकल्याणराजा ||


- समर्थ रामदास

___________________________


*** गर सिवाजी न होते तो ***

राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |

अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||

राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |

धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||

भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |

देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||

साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |

दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||

वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |

रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||

हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |

कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||

मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |

बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||

राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |

देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||

देवल गिराविते , फिराविते निसान अली |

ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||

गौर गणपती आप , औरनको देत ताप |

आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||

पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |

सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||

कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |

सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||


- कविराज भूषण.


{{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}

No comments:

Post a Comment