मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.
कुणी 'Orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात. प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.
कारण सगळे विषय 'Chat' वरच संपलेले असतात.
मग 'Chat' वर भेटूच याचं 'Promise' होतं.
आणि संभाषणातून 'Sign out' केलं जातं.
‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं.
घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.
'Available'’ आणि 'Busy' मध्ये
प्रत्येकाचा 'Status' घुटमळत राहतो.
आपणहून 'Add' केलेल्या मित्रापासून लपण्याकरिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो.
ताप आल्याचं आजकाल आईच्या आधी 'Facebook'ला कळतं. औषधापेक्षा 'Take Care'च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं.
मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net'ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.
'Chat'ला गप्पांनी आणि 'Smile'ना हास्यांनी 'Replace' करावं.
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं.
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.
चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवूया. मैत्रीला 'Technology' पासून जपून ठेवूया.
Marathi Kavita, Marathi Prem Kavita, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Lekh, Charolya....
Thodkyat
Majhya aani Majhya kahi aavadtya Marathi Kavita, Lekh, Marathi Charolya, Marathi Gaani, Marathi Videos, Marathi Kathakathan anne khahi Hindi Kavita...
Sunday, August 05, 2012
मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात...
Labels:
Friendship Day,
maitri
Subscribe to:
Post Comments (Atom)
किती सुंदर लिहितोस तू . खर सांग कस काय जमत तुला हे ?
ReplyDelete