Saturday, November 02, 2013

दिवाळी आली की...

दिवाळी आली की, वाटतं राजा तू आहेस,
तू अजुनही जीवंत आहेस . . .
प्रत्येक अंगणात तुझे गडकिल्ले उभे राहतात
त्याला खिंडारे नसतात,
ना भग्न अवस्थेतले तुझे राजवाडे असतात,
असतं ते फक्त चैतन्य ... नव्या उमेदिनं
सळसळणारं ...
मशाली, चिरागदाने, शामदाने नसतातं,
पण असतात पणत्या तुझ्या मांगल्याचं स्वरुप
सांगणार्या,
गड बांधताना एक-एक
चिमुकला अभियंता आपापली विचारशक्ती ला चिखलाने
माखलेले हात, बरबटलेले कपडे,
पण तोंडावर तेज विलसत असतं,
एक भावना मनात ज्वलंत असते,
की "हो राजा तुला बसायला,
तुझा रुबाब अन् थाट दिसायला,
तुला विराजमान व्हायला एकच एक
जागा ह्या भूतलावर आहे, ते म्हणजे
गडकोट,
आणि ती मी जागा निर्मीली आहे,
माझ्या अंगणातल्या गडावर माझ्या राजाचं
वास्तव्य
असेल, माझ्या गडाचा मीच हिरोजी इंदुलकर!!!
याहून माझ्यासाठी आनंदाची दुसरी गोष्ट
नाही !!"
आणि हे सारं पाहताना तुझे डोळे आकाशात
पाणावले
नसतील तर नवल! आणि एक वाक्य
त्या गडकर्याच्या मनात
नेहमी गुंजत राहिल,
"उभाच राहिन मी सांगेन
गाथा तुझ्या पराक्रमाची,
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या ईतिहासाची" !! जय भवानी !!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभूराजे !! शिवभक्त

1 comment:

  1. घुमे गर्जना शिवरायांची थरथरली ती मुघलाई
    "हर हर शंभो" मंत्र सांगते सह्याद्रीची वनराई

    कोणत्याही राजकीय पक्षाच्या कडेवर न बसता छत्रपतींचा उघडपणे जयजयकार करणारी माणसं दुर्मिळ होत चाललीयेत हल्ली …

    ReplyDelete