एक सत्य घटना..
ही गोष्ट आहे १९७४ ची. तेव्हा बेंगलोर शहरात IISc. मधे
सुधा कुलकर्णी नावाची विद्यार्थीनी शिकत होती.
ती एकदा हॉस्टेलवरुन लेक्चर हॉल कडे जात असताना नोटीस बोर्ड
वर एक जाहीरात पाहीली. ती जाहीरात होती प्रसिद्ध
टेलको (आताची टाटा मोटर्स) . ती खालील प्रमाणे होती.
'The company required young, bright engineers, hardworking
and with an excellent academic background, etc. At
the bottom was a small line: ‘Lady Candidates need not
apply.’
त्या शेवटच्या ओळीने सुधाची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने
सरळ टेलकोच्या मुख्य प्रबंधकाला पत्र लिहून जाब विचारायचे
ठरविले. पण त्या वेळी त्यांचे नाव माहीत नसल्याने तिने सरळ
टाटा ग्रुप्सचे प्रमुख जे.आर. डी. टाटा यांना पत्र लिहले आणि ती ते
विसरुन गेली.
१० दिवसात तिच्या पत्राला उत्तर आले. तिला टेलको पुणे ईथे
ईंटरव्हूसाठी बोलावले होते त्यासाठी लागणारा सर्व खर्च
टेलको कंपनी करणार होती. ईंटरव्हूसाठी सहा पॅनलिस्ट होते. सुधाने
एंट्री केल्याबरोबर त्यांच्यात 'हीच ती जे.आर.डीं. ना पत्र
लिहणारी वगैरे कमेंट झाले. सुधा हुशार असल्याने तिला तो ईंटरव्हू
फारसा जड गेला नाही. ईंटरव्हू झाल्यावर
त्या सहाजणांपैकी एकजण म्हणाला. 'त्या जाहिरातीत तसे
लिहण्याचे कारण म्हणजे ही जॉब शॉप फ्लोर ची आहे.
मुली सहसा तिथे काम करत नाहीत मग एव्हढा ईंटरव्हू घेउन
फायदा होत नाही पण तुम्ही स्वतः ईंट्रेस्ट दाखविल्या बद्दल
धन्यवाद. तुम्ही शॉप फ्लोरवर काम करणा-या पहील्या महिला आहात.
काही दिवस असे गेले तोच एक दिवस जे.आर.डी. टेलको पुणे ला भेट
द्यायला आले. त्यावेळी टेलकोचे मुख्य प्रबंधक सुमंत मुळगावकर होते.
सुमंत मुळगावकरांनी सुधाची ओळख शॉप फ्लोरवरची पहिली महिला अभियंता अशी करुन दिली. त्यांनी सुधाचे हस्तांदोलन केले. आता मात्र सुधाला भिती वाटत होता न करो सुमंत सर किंवा जे.आर.डीं नी पत्राचा विषय
काढला तर पण तिच्या सुदैवाने दोघेही ती गोष्ट विसरले होते. सर्व
पाहणी करुन निघण्यास त्यांना रात्रीचे ९ वाजले. तेव्हा पार्कींग
लॉट मधे नव-याची वाट पाहत असलेली सुधा दिसली.
जे.आर.डींनी विचारल्यावर तिने कारण सांगितले. तेव्हा ते म्हणाले.
' रात्र खुप झालीय आणि अशा वेळी एका स्त्रीने असे एकटे उभारणे
ठिक नाही. मी तुमच्या सोबतीला उभारतो तुमचे मिस्टर येईपर्यंत. '
आता मात्र सुधाला मनात कालवा-कालव जाणवू लागली.
ईतका मोठा माणूस आपल्याबरोबर शुल्लक वाट बघत उभा आहे.
ईतक्यात सुधाचे मिस्टर आले. सुधाने त्यांची आणि जे.आर.डीं ची ओळख करुन दिली. 'हे माझे मिस्टर नारायण मुर्ती आणि हे.. ' पुढे सुधाजी काही बोलणार एव्हढ्यात नारायण मुर्तींचा चेहरा 'अजि म्या ब्रह्म पाहिले ' असा झाला होता. जे.आर.डी. हस्तांदोलन करताना मुर्तींना म्हणाले. 'मिस्टर मुर्ती कितीही मोठे झालात तरी आपल्या बायकोला अशी वाट बघायला लावू नका ' ईतके बोलून ते निघून गेले.
पुढे जेव्हा सुधा मुर्तींनी नोकरीचा राजिनामा दिला तेव्हा सुमंत सरांनी तो सरळ जे.आर.डीं कडे पाठविला. तेव्हा जे.आर.डी. स्वत: सुधा मुर्तींना फोन करुन राजिनाम्याचे कारण विचारले.
तेव्हा सुधाजी म्हणाल्या ' माझ्या मिस्टरांनी ईन्फोसिस नावाची स्वतंत्र कंपनी काढली आहे तेव्हा त्यांच्या मदतीसाठी मला जाणे भाग आहे.
तेव्हा जे.आर.डीं.नी प्रतिप्रश्न केला, 'तुम्ही यशस्वी झाल्यावर काय करणार?'
तेव्हा सुधाजी म्हणाल्या.' काही ठरविले नाही. आम्हाला तर हो ही माहीत नाही की आम्ही यशस्वी होऊ का नाही...' मधेच वाक्य तोडत जे.आर.डी गरजले 'शट अप ! असले रडगाणे गाऊ नका. नवीन सुरवात करताय तेव्हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. ऑल दी बेस्ट!
आणि हो अयशस्वी होऊन माझ्या कंपनीत तुम्ही परत दिसता कामा नये.'
त्यांनी रिसीव्हर खाडकन ठेवला.
पण ते शेवटचे शब्द सुधाताईंच्या मनात शेवटपर्यंत घुमत राहीले
धन्य ते जेआरडी आणि धंन्य त्या सुधाताई !
आपल्यात त्यांच्यातले एक टक्का गुण जरी आले तरी आपण यशस्वी उद्योजक होऊ !