Wednesday, October 23, 2013

Pula Deshpande.... पु.ल.देशपांडे ...



**आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस.
**
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो"

** गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत.

**
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '

मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत
असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणत.

**
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही.

पु. ल. देशपांडे व मी आकाशवाणीवर एकत्र काम करत होतो. तेव्हा करारपद्धत असल्याने पगारात करार संपेपर्यंत वाढ होत नसे. एकदा आकाशवाणीच्या 27 केंद्रांचे प्रमुख संचालक आले होते. पुलंकडे पाहून ते म्हणाले, "देशपांडे, तुमचे पोट खूप वाढले आहे.' त्यावर पुलंनी तत्परतेने उत्तर दिले, ""धिस इज द ओन्ली इन्क्रीमेंट आय ऍम गेटिंग......''
**

No comments:

Post a Comment