अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर
महाराजांची योजना होती की लगेच
गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.
महाराजांनी वाघनखे खुपसली,
कोथला काढला.
सय्यद बंडा आला, जिवा महालांनी त्याला ठार केलं.
क्रुष्णाजी भास्कर आडवा आला,
महाराजांनी त्याला कापला आणि
प्रतापगडाच्या दरवाज्याकडे
पळत सुटले.
जाता जाता सोबतचे अंगरक्षक
मोजु लागले...
१,
२,
३,
४,
५,
६,
७,
८,
९
फक्त ९??
सोबत तर दहा होते...
मग कोण बाकी राहिलं राजांनी विचारलं...
कोणी तरी म्हटलं,'
संभाजी कावजी नाही जी'
राजे म्हणाले, 'नाही?
काय झालं?
मधुनच कुठे गेला?'
तेवढ्यात संभाजी कावजी
धापा टाकत आला.
राजे संतापले आणि म्हणाले,
'संभाजी कुठे होतास?'
संभाजी कावजी म्हणाला,
'राजं तुम्ही वाघनख मारली
खानाला पण म्हटलं
मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणि
त्याचं शीर कापुन आनलं'
आणि त्यानी कापुन आनलेलं खानाचं
डोकं वर केलं
राजांना दाखवायला...
राजे म्हणाले, 'अरे गड्या त्या
वाघनखांना विष लावलं होतं.
खान कसाही करुन मरणारच होता
मग तू हे वेडं धाडस का केलं..
यापुढे लक्षात ठेव
जे आपल्या योजनेत नाही ते
कधीही करायचं नाही..
एक वेळेस खान मेला नसता
तरी चाललं असतं पण जर
तुझ्या जिवाला काही बर वाईट
झालं असतं तर…
तुझ्या आईला काय तोंड
दाखवलं असतं मी.
ती तर हेच म्हटली असती
ना की शिवाजी ने स्वत:चा जीव
वाचवण्यासाठी माझ्या पोराचा
जीव घालवला.
तुझ्या जागेवर एक वेळेस मी
मेलो असतो तर चाललं असतं
पण
स्वराज्याचा एकही मावळा मरता
कामा नये.'
.
.
.
जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे
जो आपल्या एका साध्या
अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयार
आहे.
आपल्या प्रजेवर लेकरां सारखं
प्रेम केलं आहे ह्या राजानी...
'बहुत जणासी आधारू' म्हणुन
म्हणतात शिवाजी महाराजांना...
दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन!
माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन!
तलवार झालो तर "भवानी मातेची"
होईन!
आणि ...
पुन्हा मानव जन्ममिळाला तर ...
फक्त
"मराठीच" होईन
!!!जय महाराष्ट्र!!!
....महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
No comments:
Post a Comment